भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, डॉ. संजय अस्वले, माजी गटशिक्षणाधिकारी किरमाळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जाधव म्हणाले की, भारत हा विविधतेतून नटलेला देश आहे व सर्व भारतीय हिंदू, मुस्लिम, बौद्ध ,शीख, इसाई ,पारशी, जैन असे अनेक धर्माचे, जातीचे लोक एका कुटुंबाप्रमाणे देशात एकत्र राहतात. संपूर्ण जगातील सर्व राष्ट्रांनी भारताचा आदर्श घ्यावा, अनुकरण करावे अशी आमची संस्कृती आहे. सर्व भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून देशाची प्रतिमा उंचावत असल्याचे ते म्हणाले. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम पुरस्कार नरसिंग गायकवाड, द्वितीय पुरस्कार प्रिया कांबळे, तृतीय पुरस्कार साक्षी साळुंके तर उत्तेजनार्थ बक्षीस बिराजदार सोनाली, जाधव मैथिली, गायकवाड राजेश, कांबळे यशोदा, जोगे ज्योती यांनी पटकाविला. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी केले. आभार डॉ .गिरीधर सोमवंशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. चंदू पवार, डॉ. ज्ञानोबा ढोबळे आदींची उपस्थिती हाेती.
विविधतेतून एकता भित्तीपत्रक स्पर्धेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST