शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

रक्तदानाच्या महायज्ञाला उस्मानाबादेत प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST

उस्मानाबाद : सध्या राज्यात निर्माण झालेल्या रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर लोकमतने राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी ...

उस्मानाबाद : सध्या राज्यात निर्माण झालेल्या रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर लोकमतने राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी उस्मानाबादेत लोकमत व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उस्मानाबादकरांनी चांगला प्रतिसाद दिला.

लॉकडाऊन, लसीकरण, बाधित रुग्ण यामुळे रक्तदानावर यावर्षी मर्यादा आल्या आहेत. परिणामी, राज्यातील विविध ब्लड बँकांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन लोकमतने पुढाकार घेतला आहे. लोकमतचे संस्थापक-संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा - बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ते १५ जुलै या कालावधीत राज्यभर रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केला आहे. याअंतर्गत सोमवारी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. जि.प. अध्यक्षा अस्मिता कांबळे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, राष्ट्रवादीचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील, भाजपचे दत्ता कुलकर्णी, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प. सीईओ राहुल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, पोलीस उपअधीक्षक मोतीचंद राठोड, शासकीय ब्लड बँकेच्या प्रमुख डॉ. श्रीमती गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात संजय लिंबराज धोंडगे, रवींद्र वसंत कोरे, दत्तात्रय दिगंबर मस्के, सुनील दत्तात्रय वाकडे, सुवर्णा विश्वास कुलकर्णी, अंजली शिवदर्शन मुरगे, नगरसेवक प्रदीप प्रभाकर मुंडे, मसापचे शाखाध्यक्ष नितीन शिवाजी तावडे, अविनाश अजय सरवदे, असिफ महेबूब सय्यद, मोहसीन दस्तगीर शेख, प्रतापसिंह बबन शेंडगे, विठूबाई वसंतराव क्षीरसागर, विष्णू रामचंद्र उंबरे, विक्रमी रक्तदाते सिद्दिकी मुखीद अहेमद सिद्दीक अहेमद, प्रदीप प्रकाश कुलकर्णी, सचिन किशोर कुलकर्णी, समर्थ सुधाकरराव देशपांडे, माउली कोंडिबा चौरे, राहुल नानासाहेब लोमटे, विश्वजित दयानंद गव्हाणे, योगेश सुरेश फुलसे, दीपक शंकर खोत, ज्योती बाबूराव चव्हाण, सुधाकर प्रभाकर बागल, राजपाल अर्जुन काकडे, पवन मारुती सूर्यवंशी, अजिंक्य भारत धुर्वे यांच्यासह लोकमतचे कर्मचारी व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी डॉ. अभय शहापूरकर, साहित्यिक राजेंद्र अत्रे, वकील संघाचे अध्यक्ष नितीन भोसले, लक्ष्मण माने, शिवानंद कथले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.

उद्या कळंब येथे होणार शिबिर...

रक्तदानाचा महायज्ञ या उपक्रमांतर्गत उस्मानाबादनंतर आता ७ जुलै रोजी कळंब शहरात रक्तदान शिबिर होत आहे. येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी १० वाजेपासून शिबिराला सुरुवात होईल. या शिबिरात कळंब व परिसरातील राष्ट्रीय चर्मकार महासंघ, तलाठी संघटना, ग्रामसेवक युनियन, कृषी सहायक संघटना, रिपब्लिकन सेना, राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट), प्राथमिक शिक्षक संघ (पाटील गट), ऑक्सिजन ग्रुप, एनसाई संगणकशास्त्र महाविद्यालय, शिवाई प्रतिष्ठान, जलमंदिर प्रतिष्ठान, दयावान प्रतिष्ठान, रोजगार सेवक युनियन, संगणक परिचालक संघटना, एसटी आगार, जगद‌्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त परिवार, सराफा असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, डी.जी. ग्रुप, लिजंड ग्रुप, स्फूर्ती फाउंडेशन, नाभिक संघटना, लहुजी शक्ती सेना, प्रहार अपंग क्रांती संघटना सहभागी होत आहेत.