माडज : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून माडज गावात सूक्ष्म नियोजन प्रभात फेरी काढण्यात आली.
उमरगा तालुक्यात माडज या गावी पोखरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीयुक्त अवजारे सबसिडीच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. तसेच शेतकऱ्यांना सबसिडीवर स्पिंकलर सट, पाईप, ठिबक सिंचन, पानबुडी मोटर, आदी साहित्य देण्यात येते. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी चर्चा करून या उपकरणाची माहिती देण्यात येत आहे. तसेच त्यांच्याकडून ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात येत आहेत. या अनुषंगाने गावात शेतकऱ्यांना घेऊन प्रभात फेरी काढून शेतीविषयी तसेच उपकरणे, अवजारे याविषयी माहिती कृषी सहायक रवी पाटील व ऑपरेटर शांतेश्वर सूर्यवंशी यांनी दिली. याप्रसंगी सरपंच विजयकुमार बाचणे, उपसरपंच नरेंद्र माने, सदस्य राजेंद्र पाटील, भागवत माने, बळिराम गायकवाड, फुलचंद माने, आर. पी. गायकवाड, राम गायकवाड, शिवाजी गाडे, भिवाजी गायकवाड, आदींची उपस्थिती होती.