उस्मानाबाद : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी येथील माजी नगरसेवक पिराजी मंजुळे यांची भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली. यावेळी औशाचे आमदार अभिमन्यू पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता कुलकर्णी, ॲड. खंडेराव चौरे, सुधीर पाटील, अभय चालुक्य आदी उपस्थित होते. या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
‘पक्षी बचाओ पाणी पिलाओ’
(सिंगल फोटो : रणजीत मोरे ११)
उस्मानाबाद : तालुक्यातील कावलदरा येथे अंगणवाडी परिसरात ‘पक्षी बचाओ पाणी पिलाओ’ अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत महिला व बाल विकास अधिकारी अनिल कांबळे यांच्या सूचनेनुसार अंगणवाडी सेविका वैशाली इंगळे व मदतनीस कमलाबाई चव्हाण यांनी पुढाकार घेतला. या ठिकाणी ‘चिव चिव ये, चारा खा, पाणी पी’, ‘ठेवा चारा ठेवा पाणी, पक्षी जपा लेकरावाणी’, असे फलक लावून जनजागृती करण्यात आली आहे.