शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
3
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
4
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
5
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
7
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
8
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
9
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
10
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
11
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
12
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
13
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
14
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
15
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
16
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
17
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
18
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
19
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
20
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

एसटीच्या रातराणीला संमिश्र प्रतिसाद, ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST

उस्मानाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने ७ जूनपासून बससेवा सुरू केली आहे. मागील दहा दिवसांपासून रातराणी ...

उस्मानाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने ७ जूनपासून बससेवा सुरू केली आहे. मागील दहा दिवसांपासून रातराणी बसेस सुरू झाल्या आहेत. मात्र, दुसरीकडे ट्रॅव्हल्स वाहतूक पू्र्वपदावर आली असून, ट्रॅव्हल्सना प्रवासी मिळत असल्याने ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने १५ एप्रिलपासून बससेवा बंद हाेती. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या घटू लागली. त्यामुळे ७ जूनपासून राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यांतर्गत व बाहेरच्या जिल्ह्यात बसेस सोडल्या. बसेसना प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागल्याने फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत. मागील १० दिवसांपासून रातराणी गाड्याही सुरू करण्यात आल्या आहेत. रातराणी बसेसना संमिश्र प्रतिसाद मिळत आहे; तर दुसरीकडे ट्रॅव्हल्सना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उस्मानाबाद शहरातून जवळपास विविध मार्गांवर १५ ट्रॅव्हल्स प्रवाशांच्या सेवेत धावत असून, ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल होत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅव्हल्सचालकांनीही प्रवाशांना मास्क व सॅनिटायझर बंधनकारक केले आहे.

एसटीच्या सुरू असलेल्या रातराणी बसेस

उस्मानाबाद-बोरिवली

उस्मानाबाद-पुणे

उस्मानाबाद-मुंबई

उस्मानाबाद-भिवंडी

उस्मानाबाद-कोल्हापूर

उस्मानाबाद-हैदराबाद

एसटीकडे चार स्लीपर

उस्मानाबाद आगाराकडे एकूण ६ स्लीपर बसेस असून, सध्या हैदराबाद मार्गावर २, मुंबई मार्गावर २ बसेस धावत आहेत; तर बंगलोर मार्गावर धावणाऱ्या २ बसेस बंद आहेत.

साध्या ८ रातराणी बसेस सुरू आहेत. रातराणी बसेस पुणे, हैदराबाद, बोरिवली, मुंबई, कोल्हापूर, भिवंडी या मार्गांवर धावत आहेत. सध्या सुरत मार्गावरील रातराणी बसही बंदच आहे.

एसटीपेक्षा तिकीट जास्त

राज्य परिवहन महामंडळाची रातराणी बससेवा सुरू झाली असून मुंबई, पुणे, बोरिवली, कोल्हापूर या मार्गांवर बसेस धावत आहेत. महामंडळाने तिकिटाचे दर आहे तेच ठेवले आहेत. मुंबईला एसटीचे सीटर कम स्लीपरला ७१५ रुपये तिकीट आहे; तर बोरिवली, दादरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचे स्लीपर तिकीट ८०० रुपये आहे.

स्वच्छ अन् आरामदायी प्रवास म्हणून...

एसटीच्या रातराणी बसेस सुरू आहेत की नाहीत हे माहीत नव्हते. त्यामुळे मुंबईहून उस्मानाबादला ट्रॅव्हल्सने आलो. आता जातावेळी ट्रॅव्हल्सने परत जात आहे. स्वच्छ अन् आरामदायी प्रवास असल्याने ट्रॅव्हल्सने प्रवास करीत आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी उतरायचे आहे, त्या भागात ट्रॅव्हल्स सोडते. त्यामुळे ट्रॅव्हल्सना प्राधान्य दिले.

- राहुल गवळी, प्रवासी

मागील महिन्यापासून ट्रॅव्हल्स नियमित सुरू आहेत. त्यामुळे पुण्याहून येताना ट्रॅव्हल्सने येत आहे. बसना ट्रॅव्हल्सपेक्षा तिकीट कमी आहे. ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायी आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सने प्रवास करीत आहे. शिवाय, सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅव्हल्सचालकांकडून खबरदारी घेतली जात आहे.

- तुकाराम गरड, प्रवासी