उस्मानाबाद शहरातील दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या प्रभागात लसीकरण मोहीम राबविली जात असून, शनिवारी वैराग रोड परिसरातील नागरी आरोग्य प्राथमिक केंद्रांतर्गत आर्य चाणक्य महाविद्यालय, नगर परिषद शाळा क्रमांक ६ सांजा रोड, रामनगर भागातील नागरी प्राथमिक केंद्र, मुरुम प्राथमिक जिल्हा परिषद कन्या शाळा, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,
उपजिल्हा रुग्णालय तुळजापूरअंतर्गत नगर परिषद गार्डनच्या पाठीमागील सी.ओ. क्वाॅर्टर, विश्वासनगर, हडको, कळंब उपजिल्हा रुग्णालयांतर्गत विठ्ठल मंदिर सभागृह येथे लस उपलब्ध असेल. परंडा उपजिल्हा रुग्णालयांतर्गत भवानीशंकर मंदिर येथे लस घेता येणार आहे. ज्या नागरिकांचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांनीच दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.