मुरुम : उमरगा तालुक्यातील नाईकनगर (मुरुम) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रितेश रमेश जाधव यांची तर उपसरपंचपदी वालचंद ठाकरु राठोड यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली.या निवडीसाठी सोमवारी बैठक पार पडली. यावेळी सरपंच पदासाठी रितेश जाधव व कल्पना राठोड यांचे तर उपसरपंच पदासाठी वालचंद राठोड आणि अरुण राठोड यांचे अर्ज आले होते. मात्र, यापैकी कल्पना राठोड व अरुण राठोड या दोघांनी अर्ज मागे घेतल्याने सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शेरेकर व ग्रामसेवक माने यांनी काम पाहिले. नाईकनगर (मु) ग्रामपंचायतीच्या सात पैकी सहा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे फक्त एका जागेसाठी निवडणूक झाली होती. त्यात काँग्रेसचे रितेश जाधव विजयी झाले होते.
नाईकनगरमध्ये जाधव, राठोड यांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST