यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यात म्हटले आहे, मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ५८ मूक, ठोक मोर्चे काढले. शिवाय, ५० मराठा बांधव शहीद झाले. तरीही सरकारने मराठा बांधवांच्या आरक्षणासंबंधी भक्कमपणे बाजू न मांडल्याने उच्चशिक्षित मराठा बांधवांना नोकरीपासून व वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या न्यायालयातील सुनावणीत सरकारने भक्कमपणे बाजू मांडावी, अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सरकारच्या विरोधात महाराष्ट्रभर बोंब मारो आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य समन्वयक सज्जनराव साळुंके, जीवनराजे इंगळे, अर्जुन साळुंके, महेश गवळी, अजय साळुंके, धैर्यशील कापसे, आण्णासाहेब क्षीरसागर, प्रशांत अपराध, आलोक शिंदे, कुमार टोले, प्रशांत इंगळे, दिनेश बागल, महेश चोपदार, गोरक्षनाथ पवार, प्रतीक रोचकरी, अशोक फडकरी, राम चोपदार, आदी उपस्थित होते.
...तर महाराष्ट्रभर बोंब मारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST