जळकाेट शाळेत नवागतांचे स्वागत
तुळजापूर - तालुक्यातील जळकाेट येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चाैथीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नवीन प्रवेश प्रक्रियाही सुुरू करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापिका टाेणपे, सहशिक्षिका कांबळे, साेमवंशी, तरमाेडे, चव्हाण आदींनी विद्यार्थी राजहंस रेणुके, पालक संजय रेणुके यांचे स्वागत केले.
बससेवा सुरू, गैरसाेय दूर
तेर - काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर कळंब आगाराने तेर-साेलापूर ही बस बंद केली हाेती. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसाेय हाेत हाेती. दरम्यान, काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर महामंडळाने १६ जूनपासून ही बससेवा पुन्हा सुरू केली आहे. बससेवा पूर्ववत झाल्याबद्दल परिसरातील प्रवाशांसह ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जाऊ लागले आहे. याप्रसंगी चालक उत्तम माने, वाहक अलीम बागवान आदींची उपस्थिती हाेती.
तुळजापूर येथे हाॅस्पिटल सुरू करा
तुळजापूर - तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने भाविकांसह परिसरातील रुग्णांसाठी मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल उभारण्यात यावे, अशी मागणी ॲड. शिरीष कुलकर्णी, किशाेर गंगणे यांनी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे करण्यात आली आहे. पंधरा दिवसात याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दस्तापूर येथे गरजूंना साहित्य वाटप
लाेहारा - तालुक्यातील दस्तापूर येथे सहसंयाेग स्वयंम शिक्षण प्रयाेग संस्थेच्यावतीने गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य व किराणा साहित्य कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी सहसंयाेग स्वयंम संस्थेचे उमरगा, लाेहारा तालुका प्रमुख शीतल रणखांब, छबुबाई गावडे, उपसरपंच साेमनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनीषा काळाप्पा, ग्रामसेवक जी. टी. इंगळे, श्वेता वेलदाेडे, सुरेंद्र काळप्पा आदींची उपस्थिती हाेती.
आराेग्य कर्मचाऱ्यांचा उपनगराध्यक्षांकडून सत्कार
(फाेटाे आहे)
उस्मानाबाद - शहरातील प्रभाग क्र. १६ व १९ मध्ये काेराेना लसीकरण माेहीम राबविण्यात आली. यावेळी पालिकेचे उपनगराध्यक्ष अभय इंगळे व राज निकम यांनी जिल्हा रुग्णालयातील डाॅ. खान, कानडे, ज्ञानेश्वर निकम, राेहित पांढरे, सुहास चव्हाण, गायकवाड यांचा सत्कार केला. प्रभागनिहाय लसीकरण माेहीम राबविण्यात यावी, यासाठी उपनगराध्यक्ष इंगळे यांनी पाठपुरावा केला हाेता. त्यानुसार शहराच्या विविध भागात ही माेहीम सुरू आहे. याबद्दल नागरिकांनी उपनगराध्यक्ष अभय इंगळे यांचे आभार मानले.
नायगावकर ‘झेडपी’ युनियनचे जिल्हा उपाध्यक्ष
(फाेटाेसह घ्या)
उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निलेश नायगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात १४ जून राेजी युनियनची बैठक झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी निलेश नायगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तत्पूर्वी विजय देशमुख यांनी नायगावकर यांचे नाव उपाध्यक्ष पदासाठी सूचित केले हाेते. प्रास्ताविक ऋषिकेश पिंगळे यांनी केले. बैठकीस संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जाधव, उत्रेश्वर उंबरे, प्रवीण खरसाडे, भाऊसाहेब गाडे, राहुल माने, विजय मेनकुदळे, फारूख पटेल, सचिन देवगिरे, मधुकर कांबळे, अंकुश पेठे, प्रदीप कुलकर्णी, शरद मुंढे, नंदकुमार कदम, शैलेश ताटे, भास्कर काेल्हे, सचिन कुलकर्णी, भाऊसाहेब व्हरकटे, सुरेश काेळी, विनाेद गायकवाड आदी उपस्थित हाेते.