जालना : येथील जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या पुढाकारामुळे जालना शहरात स्वच्छतेसाठी विशेष मोहीम दर सोमवारी एका झोनमध्ये घेण्यात येत आहे. त्यामुळे स्वच्छता करण्यात येत असलेल्या झोनमध्ये साफसफाईचे कामास गती मिळाली आहे.त्यावेळी नायक यांनी प्रत्येक सोमवारी एका झोनमध्ये संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, असे आदेश दिले होते. विशेष म्हणजे नायक हे स्वत: शहरातील या स्वच्छता मोहिमेच्या कामांना भेटी देऊन पाहणी केली आहे. या मोहिमेत शहरातील संपूर्ण झोनमध्ये कार्यरत असलेले सर्व सफाई कामगार, वाहने, एकाच झोनमध्ये एकत्र काम करतात. त्यानुसार नगर परिषदेने नियोजन करुन प्रत्येक सोमवारी एका झोनमध्ये काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार ३० जून पासून आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. ३० रोजी सदर बाजार एक या झोनमध्ये विशेष मोहिमेची सुरुवात केली आहे. दरम्यान, ७ जुलै रोजी सदर बाजार दोन मध्ये जिल्हाधिकारी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम घेण्यात आली. या मोहिमेस सकाळी सहा सुरुवात करण्यात आली. यामध्ये सदर बाजार एक मधील ४८ कर्मचाऱ्यांनी रामदेवबाबा गल्ली, मिशन दवाखाना परिसर, भिस्तीपुरा, खर्डेकर कॉम्प्लेक्स, चांभारवाडा, अमित अपार्टमेंट, बिहारीलालनगर येथे स्वच्छतेचे काम केले. सदर बाजार दोन मधील २७ कर्मचाऱ्यांनी सूर्या हॉटेल ते भगतसिंग चौक, हनुमानघाट, खांडसरी, बुध्दविहार, दादावाडी परिसर येथे काम केले. सदर बाजार तीन मधील एकूण २८ कर्मचाऱ्यांनी जेठे यांचे घर ते वाघमारे यांच्या घरापर्यंत हजाम गल्ली, गुडीमाता रोड, सुनील लाहोटी यांची गल्ली, लाहोटी मागील गल्ली, रावसाहेब राऊत यांची गल्ली, मसोबा रोड, नवपुते गल्ली, कबूतर मोहल्ला, प्लॉट रोड, डगल्स शाळेसमोरील गल्ली. मोहिमेमध्ये उपजिल्हाधिकारी, माचेवाड, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी पाहणी करुन मार्गदर्शन केले. मोहिमेमध्ये उपमुख्याधिकारी मुखेडकर, अग्रवाल, देशमुख, पवार, वाघमारे, उपस्थित होते. तसेच पाटील, पंडित पवार, संजय खर्डेकर, अशोक लोंढे, राम मोरे, कारभारी तायडे हे उपस्थित होते. (प्रतिनिधी)३७ टन कचरा उचललाया मोहिमेमध्ये एकूण १७ जवान, ६ वाहन चालक, ६३ पुरुष कामगार, ६३ स्त्री कामगार, ६१ खाजगी कामगार असे एकूण १८३ कर्मचारी कार्यरत होते. तसेच नगर परिषदेचे चार ट्रॅक्टर, चार घंटा गाडी, एक कॉम्पॅक्टर, एक डम्मर प्लेलर, एक मिनी लोडर व पाच खाजगी ट्रॅक्टर अशी वाहने कार्यरत होती. ही सर्व वाहने मिळून शहरातील एकूण ३७ टन कचरा सारवाडी रोडवरील डम्पींग ग्राऊंडवर नेऊन टाकण्यात आला.४काद्राबाद झोनमधील ५० कर्मचाऱ्यांनी रत्ना एक्सरे ते शिशू विहार शाळापर्यंत, आनंद नगर कॉर्नर ते माताली कुंडी, माताली कुंडी ते बाबूसेठ दायमा यांच्या घरापर्यंत, संतोषवाडी, गोपाळपुरा, पेंशनपुरा या भागात काम केले.
पालिकेकडून झोननिहाय स्वच्छता मोहीम
By admin | Updated: July 12, 2014 01:16 IST