शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

राज्यातील जि.प. अधिकारी आंदोलन छेडणार

By admin | Updated: June 9, 2014 01:04 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

औरंगाबाद : जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनासोबत पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत मागण्यांवर तोडगा न निघाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेची सर्वसाधारण सभा रविवारी येथे झाली. या सभेत वरील इशारा देण्यात आला. या सर्वसाधारण सभेला सिडकोचे प्रशासक सुनील केंद्रेकर, नाशिक जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आणि औरंगाबाद जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष गणेश चौधरी, सचिव अशोक पाटील, कार्याध्यक्ष राजेश कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप देशमुख, औरंगाबाद जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, वासुदेव सोळंके आदींची उपस्थिती होती. शासनाने प्रलंबित मागण्यांसंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात चर्चेसाठी बोलावले आहे. या चर्चेत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय या सभेत एकमताने घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष गणेश चौधरी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘गेल्या तीन वर्षांपासून देशपातळीवर विविध योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक येत आहे. विकास सेवेतील अधिकाऱ्यांच्या परिश्रमाला हे यश मिळत आहे. तरीही अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. प्रलंबित मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी शासनाला ३१ मेपर्यंत वेळ दिली होती. या मुदतीत कार्यवाही झाली नाही. शासनाने पुढील आठवड्यात चर्चेसाठी बोलावले आहे.’ प्रमुख मागण्यामहाराष्ट्र विकास सेवा राज्य नागरी सेवा घोषित करून पदोन्नतीने भारतीय प्रशासकीय सेवेत संधी उपलब्ध करून द्यावी.राज्यातील किमान ११ जिल्हा परिषदांमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पद विकास सेवेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवावे.राज्यातील किमान ५० टक्के मनपातील आयुक्तपदांवर विकास सेवेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात.राज्यातील विकास सेवेतील अधिकाऱ्यांची रिक्त असलेली ३० ते ४० टक्के पदे तातडीने भरावीत. पदोन्नतीची कार्यवाही वर्षातून दोन वेळा करावी.