जालना : भरधाव कारच्या धडकेत २१ वर्षीय युवक ठार झाला. ही घटना मंठा बायपास रस्त्यावर घडली. याप्रकरणी शनिवारी सदर बाजार पोलिस ठाण्यात जि.प. सदस्य सतीश टोपे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील टेलिकॉम कॉलनीतील रहिवासी विशाल प्रभाकर इंगळे हा युवक २९ डिसेंबर रोजी बाजारात खरेदीसाठी मंठा चौफुली ते अंबड चौफुली रस्त्याने जात असताना बायपास रोडने रामनगरकडे जाताना समोरून येणाऱ्या भरधाव कारने (एम.एच.२१/ए.जी.४७७७) विशाल यास धडक दिली. यात विशाल हा गंभीर जखमी झाला. सायकलचे दोन तुकडे झाले. अपघातानंतर विशाल यास उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना १ जानेवारी रोजी तो मरण पावला. अपघात घडला त्यावेळी सतीश टोपे हे कार चालवत असल्याचे मयत विशालचे वडील प्रभाकर रामचंद्र इंगळे यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले. याप्रकरणी पोलिसांनी टोपे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास नाईक पोलिस कॉन्स्टेबल खंदारे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)
कारच्या धडकेत युवक ठार
By admin | Updated: January 5, 2015 00:36 IST