लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘महाराष्ट्रात जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा येथील कृषी वैज्ञानिकांनी जमिनीतील पाण्याचा उपसा करण्यावर भर दिला. त्यामुळे भूगर्भातील ७२ टक्के पाणी स्रोत सुकून गेले आहेत. आधुनिक धरणीचे पोट रिकामे करण्याचे काम या वैज्ञानिकांनी केले, अशी घणाघाती टीका रेमन मॅगेसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केली. वाल्मी येथे बुधवारी (दि.७) पार पडलेल्या राज्यस्तरीय जलसाक्षरता उजळणी प्रशिक्षण वर्गामध्ये ते बोलत होते.जल व भूमिव्यवस्थापन संस्था (वाल्मी), मराठवाडा विभागीय जलसाक्षरता केंद्र आणि यशदातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, वाल्मीचे महासंचालक दीपक सिंगला, राज्यस्तरीय जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, आ. अतुल सावे, एस.डी. हजारे आदी मंचावर उपस्थित होते.पीकपेºयाची मान्सून चक्राशी सांगड घालून जमिनीत पाणी जिरवण्यावर भर देण्यात यावा, असा सल्ला देताना डॉ. सिंह यांनी भूगर्भातील जलाशय वाढले नाहीत, तर मराठवाड्याचा राजस्थान होण्यास वेळ लागणार नाही, अशी चिंतादेखील व्यक्त केली. जलसाक्षरता वाढविण्यासाठी गावागावांत नियमित ग्रामसभा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.शासनाने जलसाक्षरता जलजागृतीचा उपक्रम लोकसहभागातून स्वयंसेवकांद्वारे राबविण्याचा उपक्रम हाती घेतलेला असून, त्याअंतर्गत जलनायक, जलयोद्धे, जलप्रेमी, जलकर्मी आणि जलसेवक, अशी ‘फाईव्ह स्टार’ फळी निर्माण करण्यात येणार आहे. एकूण ७२ जणांची यामध्ये नियुक्ती करण्यात येणार असून, उपक्रमाच्या भविष्यकालीन रूपरेषेवर मार्गदर्शन करण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. रूपाली गोरे यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. एम.बी. धादवड यांनी आभार मानले.कृषी विभागावर ताशेरेकृषी विभागाच्या अकार्यक्षमतेवर ताशेरे ओढताना प्रा. राम शिंदे म्हणाले की, पाण्याची उपलब्धता आणि पिकाला लागणारे पाणी याचा कधी शेतकºयांनी विचारच केला नाही. त्यामुळे जलव्यवस्थापन कोलमडण्याच्या मार्गावर आहे. कृषी सहायक शेतकºयांना शेतीव्यवस्थापन करण्यात मदत करीत नाही. शेतकºयांशी संवाद साधून पाणी व पिकाचे चक्र जुळविण्याचे काम होत नाही. त्यामुळे जलसाक्षरतेच्या कार्यात स्वयंसेवकांची मदत घ्यावी लागते.
कृषी वैज्ञानिकांनी केले सर्वाधिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:30 IST
‘महाराष्ट्रात जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा येथील कृषी वैज्ञानिकांनी जमिनीतील पाण्याचा उपसा करण्यावर भर दिला. त्यामुळे भूगर्भातील ७२ टक्के पाणी स्रोत सुकून गेले आहेत. आधुनिक धरणीचे पोट रिकामे करण्याचे काम या वैज्ञानिकांनी केले, अशी घणाघाती टीका रेमन मॅगेसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केली. वाल्मी येथे बुधवारी (दि.७) पार पडलेल्या राज्यस्तरीय जलसाक्षरता उजळणी प्रशिक्षण वर्गामध्ये ते बोलत होते.
कृषी वैज्ञानिकांनी केले सर्वाधिक नुकसान
ठळक मुद्देराजेंद्र सिंह : भूगर्भातून वारेमाप पाणी उपसा