औरंगाबाद : तब्बल २१ दिवसांपासून मतदान यंत्रात कुलूपबंद उमेदवारांचे राजकीय भवितव्य शुक्रवारी (दि. १६) दुपारी १२ वाजेपर्यंत निश्चित होणार आहे. अटीतटीच्या झालेल्या लढतीत कोणाची सरशी होणार? आघाडी की महायुती, कोण बाजी मारणार यावर शहरात गरमागरम चर्चा झडू लागल्या आहेत. औरंगाबाद व जालना लोकसभा मतदारसंघासाठी दि. २४ एप्रिल रोजी मतदान झाले होते. तत्पूर्वी जोरदार प्रचाराने अवघा मतदारसंघ ढवळून निघाला होता. औरंगाबाद व जालना मतदारसंघाचे तीनदा प्रतिनिधित्व केल्यानंतर चौथ्यांदा शड्डू ठोकून मैदानात उतरलेले महायुतीचे उमेदवार अनुक्रमे चंद्रकांत खैरे व रावसाहेब दानवे यांनी प्रचारात मारलेल्या मुसंडीला काँग्रेस आघाडीचे औरंगाबादचे तरुण उमेदवार नितीन पाटील व जालन्याचे विलास औताडे यांनी दिलेली जोरदार टक्कर चर्चेची ठरली होती. आपचे औरंगाबादचे उमेदवार सुभाष लोमटे व जालन्याचे दिलीप म्हस्के यांच्या प्रवेशाने ही लढत अधिकच लक्षणीय झाली होती. औरंगाबादेत कोणता ‘फॅक्टर’ चालला? मोदी लाटेवर आरूढ झालेले चंद्रकांत खैरे हे तरणार की दलित, मुस्लिम, मराठा मतांवर भिस्त असलेले नितीन पाटील जिंकणार, आम आदमीचे सुभाष लोमटे, समाजवादीचे अॅड. सदाशिव गायके यांनी किती मते आपल्याकडे खेचली, यावर या लढतीचा निकाल अवलंबून राहणार आहे. मोदी लाट की मुस्लिम, मराठा, दलित फॅक्टर चालला, यावर पैजा लागत आहेत. सुभाष लोमटे यांनी मुस्लिम व हिंदूंची मतेही काही प्रमाणात आकर्षित केली होती. त्यामुळे त्यांनी अधिक मते घेतल्यास ते कोणाला धोकादायक ठरतील, आदी अनेक आडाखे विविध पक्षांचे कार्यकर्ते, राजकीय जाणकार व नागरिक लावत होते. काही अपक्ष उमेदवारांनी प्रचारात चांगलेच रंग भरले होते. औरंगाबादेत या प्रमुख उमेदवारांसह तब्बल २७ उमेदवार रिंगणात होते. त्यात महायुतीचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे नितीन पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे अब्दुल खुद्दूस, आंबेडकर नॅशनल काँग्रेसच्या पुष्पा जाधव, प्रबुद्ध रिपब्लिकनचे मन्नालाल बन्सवाल, समाजवादीचे अॅड. सदाशिव गायके, वेल्फेअर पार्टी आॅफ इंडियाचे सय्यद शफियोद्दीन, आम आदमीचे सुभाष लोमटे आणि अपक्ष अब्दुल अजीज, उद्धव बनसोडे, अंकुश तुपसंमुद्रे, कैलास ठेंगडे, जगदीप शिंदे, मधुकर त्रिभुवन, नानासाहेब दांडगे, नदिम राणा, सुरेश फुलारे, डॉ. फेरोज खान, बाळासाहेब सराटे, बाळासाहेब आवारे, जवाहरलाल भगुरे, भानुदास सरोदे, जालन्यात काय होणार? जालना लोकसभा मतदार संघात प्रमुख लढत महायुतीचे रावसाहेब दानवे व काँग्रेस आघाडीचे विलास औताडे यांच्यातच होणार असली तरी आपचे दिलीप म्हस्के हे किती मतविभाजन घडवून आणतात व कुणाला लाभदायक आणि कुणाला धोकादायक ठरतात, यावर निकालाची होडी हेलकावे खाणार आहे. ‘चकवा आणि उपरा’ ही दोन विशेषणे जालन्यात निवडणुकीच्या काळात चांगलीच प्रसिद्धीस पावली होती. जालन्यातून तब्बल २२ उमेदवारांनी आपले भवितव्य अजमावले आहे. निकाल दुपारी १२ वाजेपर्यंत औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, उद्या शुक्रवारी सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या एकूण २१ फेर्या होणार असून, प्रत्येक फेरीला दहा मिनिटांचा अवधी लागणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पार पडून दुपारी १२ वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने यावेळी मतमोजणी केंद्र शहराबाहेर शेंद्रा एमआयडीसी परिसरात ठेवले आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक शालिनी मिश्रा आणि निवडणूक निर्णय अधिकारी विक्रमकुमार यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पहिल्यांदा पोस्टल मतदान मोजले जाईल. त्यानंतर ८.३० वाजता मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतदानाची मोजणी सुरू होईल. मोजणी केंद्रावर प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल लावण्यात आले आहेत. सहा विधानसभा क्षेत्राच्या एकूण ८४ टेबलवर एकाच वेळी ही मतमोजणी होईल. पहिल्या फेरीसाठी अर्धा तास लागणार असून, त्यापुढील प्रत्येक फेरीसाठी केवळ दहा मिनिटांचा वेळ लागणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व २१ फेर्या पूर्ण होऊन अंतिम निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. ८४ टेबलवर होणार मोजणी पहिल्या फेरीचा निकाल सकाळी ९ वाजता लागणार दुसर्या फेरीपासून प्रत्येक फेरीसाठी दहा मिनिटे मोजणी केंद्राजवळ पाचशे पोलिसांचा फौजफाटा दोन किलोमीटर अलीकडेच प्रवेशबंदी केबल नेटवर्कवर लाईव्ह प्रक्षेपण सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी मतमोजणी केंद्रावर उमेदवार, मोजणी प्रतिनिधींनाच प्रवेश मतमोजणी केंद्रात मोजक्याच व्यक्तींना प्रवेश असणार आहे. उमेदवार, त्यांचे मोजणी प्रतिनिधी आणि पत्रकार एवढ्या व्यक्तींनाच आत जाता येणार आहे. इतर व्यक्तींना मतदान केंद्रापासून दूर ठेवले जाणार आहे. त्यासाठी बॅरिकेडस् टाकण्यात आले आहेत. मोजणी केंद्रात प्रत्येकाची झडती घेऊनच आत सोडले जाणार आहे. मोबाईल, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ आत नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोणाची होणार सरशी; लक्ष निकालाकडे
By admin | Updated: May 16, 2014 00:38 IST