शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळेबहाद्दरांविरुद्ध कधी आवळणार फास?

By admin | Updated: June 13, 2014 00:33 IST

दिनेश गुळवे , बीड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅँकेत कित्तेक घोटाळ्यांची प्रकरणे केवळ चौकशी फेऱ्यात अडकलेले आहेत. कित्तेक प्रकरणात ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे.

दिनेश गुळवे , बीडजिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅँकेत कित्तेक घोटाळ्यांची प्रकरणे केवळ चौकशी फेऱ्यात अडकलेले आहेत. कित्तेक प्रकरणात ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. गंभीर बाब म्हणजे ज्यांच्यावर आरोप आहेत असे अधिकारी, कर्मचारी आजही बॅँकेत उजळ माथ्याने ‘काम’ करीत आहेत. काही प्रकरणांना तर वरिष्ठांनीच ‘स्टे’ दिला आहे. बॅँकेत शेतमजूर, वृद्ध, महिला यांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. असे असतानाही बॅँक ‘दोषींना’ कुठवर पाठीशी घालणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बॅँकेचे तत्कालीन प्रशासक टाकसाळे यांच्यावर जलद झालेल्या कारवाईने इतरांचा मुद्दा चर्चेचा ठरत आहे. बॅँकेत अनेक गैरप्रकार झालेले आहेत. त्यावर विभागीय निबंधक, जिल्हा उपनिबंधक यांनी वांरंवार ठपका ठेवलेला आहे. काही प्रकरणांना तर वरिष्ठ पातळीवरून स्टे देण्यात आला आहे. असे असताना टाकसाळे यांचे प्रकरण ‘जलद’ गतीने हाताळून त्याला ‘अंजाम’ कसा देण्यात आला. यावरून सध्या जिल्हाभरात गहजब माजला आहे. बॅँकेत अनेक गैरप्रकार झालेले आहेत, त्यातील मुख्य म्हणजे २०१० मध्ये झालेले २५० कर्मचाऱ्यांचे भरती प्रकरण. या प्रकरणात अनेकांनी आपले हात ओले करू घेतले. या प्रकरणावर शासकीय तपासणीसांनी ठपका ठेवलेला आहे. या प्रकरणात अद्यापही सोनवणे हे अधिकारी चौकशी करीत आहेत. गंभीर प्रकरण असताना, यास कासव गती व टाकसाळे यांचे प्रकरण ‘एक्सप्रेस’ सारके हाताळले गेले? असे का? इतर प्रकरणेही निकाली काढा? अशी मागणी अ‍ॅड. राहुल मस्के यांनी केली आहे. बँकेतून अनेकांना बेकायदेशीर कर्ज वाटप करण्यात आले, तारण नसताना कर्ज, असुरक्षित कर्ज, क्षेत्र नसताना कर्ज, कर्जाचा दिलेल्या कारणासाठी विनीयोग न करणे आदी प्रकरणात कलम ८८ नुसार डीडीआर वांगे यांच्याकडे चौकशी सुरू आहे. या चौकशीचा फार्सही दिवसेंदिवस सुरू आहेत. त्यातून ठोस काही समोर येत नाही. या संदर्भात वांगे म्हणाले, शासकीय नियमानुसार चौकशी सुरू आहे. विशेश म्हणजे काही प्रकरणात पोलीस कारवाई करा, असे चौकशी अधिकाऱ्याने सूचविलेले आहे, यास वरिष्ठ स्तरावरून ‘स्टे’ असल्याचे बॅँकेतूनच सांगण्यात येते. बॅँकेत असा प्रकार होत असेल तर सामान्यांना न्याय कधी मिळणार?, दोषींवर कारवाई कधी होणार असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांनी उपस्थित केला आहे. गतवर्षी बॅँकेत ४ कोटींचा पीक विमा घोटाळा झाला. यात आठ ते दहा जण दोषी आहेत. त्यांच्यावर आॅडीटर यांनी ठपका ठेवला आहे. ४ कोटींचा गैरव्यवहार झाल्यानंतरही त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप राजाभाऊ देशमुख यांनी केला आहे. यासह असुरक्षित कर्ज वाटपाचा अहवाल २०१० मध्ये विभागीय सहनिबंधक कांबळे यांनी दिला आहे. यामध्ये २० अधिकाऱ्यांना व १७० कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर पदोन्नत्या दिल्याचा ठपका ठेवला आहे. हा मुद्दाही अद्याप बासणात आहे. बॅँकेतील गैरव्यवहरांच्या प्रकरणातील अनेक चौकशा हनुमानाच्या शेपटीप्रमाणे लांबत असतानाच साडेतीनशे कोटींच्या ठेवी देणारे, तीनशे कोटींची वसुली करणारे व दोषींवर कायदेशीर कारवाई करणारे तत्कालीन प्रशासक यांच्यावरच जलद कारवाई कशी होते? असा प्रश्न करून इतरांच्याही चौकशा पूर्ण करून दोषींवर कारवाईची मागणी शेतकरी संघटनेचे नेते कालीदास आपेट यांनी केली आहे. रोखे घोटाळ्यातील दोषींवर कारवाईचा ‘फार्स’बॅँकेत २००७-२००८ मध्ये तब्बल ६ कोटी ४० लाख रुपयांचा रोखे घोटाळा झाला होता. यामध्ये बॅँकेतील अनेक अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. सदर पैसे चुकीच्या पद्धतीने गुंतविल्याने बॅँकेचे मोठे नुकसान झाले. यामध्येही चौकशी झाली, काही दोषी आढळले. मात्र, पुन्हा चौकशीचा घाट घालण्यात आला. यामुळे ठपका असलेले काही सेवा करून निवृत्त झाले तर काही अद्यापही बॅँकेत उजळ माथ्याने काम करीत आहेत. मग अशांवर कारवाई कधी? ज्यांनी सामान्यांच्या पैशांची विल्हेवाट लावली त्यांना का पाठीशी घातले जातेय? असा प्रश्न भाई मोहन गुंड यांनी उपस्थित केला आहे.