गेलेल्या तरुणाला चाकू लावून लुटले
--
मोबाईलसह २ हजार रुपये घेऊन चोरटे पसार : बेगमपुरा पोलिसांनी काही तासांत आरोपींना मुद्देमालासह घेतले ताब्यात
---
औरंगाबाद :ः हिमायतबाग टेकडी परिसरात रविवारी सकाळी ११ वाजता फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांनी अडवले. चाकूचा धाक दाखवत मोबाईलसह दोन हजार घेऊन दुचाकीवर पसार झाले.
ऋतिक नायबराव दहिजे (२१, रा. सलीम किराणाजवळ ,जयभीमनगर), ललित उर्फ पेंडी काळे (रा. जयभीमनगर), ललित शंकर अलकुंटे (रा. गुलाबवाडी) या तिघांवर बेगमपुरा पोलिसांत गुन्हा नोंंद करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, राहुल नानासाहेब शिंदे ( २६, रा. गजानन मंदिर, एन ११ सिडको) हा युवक रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हिमायतबाग टेकडी परिसरात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी तिघांनी त्याला रस्त्यात अडविले. दोघांनी राहुलचे हात पकडून तिसऱ्याने चाकूचा धाक दाखवत त्याची झडती घेतली. त्यांच्या खिशात दोन मोबाईल सापडले. त्यापैकी ॲपल कंपनीच्या मोबाईलमुळे पकडले जाऊ म्हणून तो राहुलला परत दिला. एक मोबाईल आणि त्याच्या कव्हरमधील २ हजार घेऊन पसार झाले. या मोबाईलमध्ये राहुलने लुटारूंचे पसार होतांना फोटो काढले. त्यांनी प्रकार आमखास मैदानाजवळ नाकाबंदीवरील पोलिसांना सांगितला. फोटो दाखवल्यावर पोलिसांनी पेंडी काळे व ललित हळकुंडेला ओळखले. बेगमपुरा पोलिसांनी काही तासांत त्यांना ताब्यात घेतले. त्यांना मुद्देमालासह अटक केली.