खुलताबाद : जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर व खुलताबादच्या मंदिरास मेघालय राज्याचे राज्यपाल एन. षण्मुगनाथन यांनी भेट देऊन पाहणी केली व घृष्णेश्वर मंदिरात अभिषेक करून दर्शन घेतले.राज्यपालांचे दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वेरूळ लेणी परिसरात आगमन झाले. त्यांनी कैलास लेणीला भेट देऊन एक-एक कलाकृती न्याहाळून पाहिली व ते हरखून गेले. त्यानंतर बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराचे दर्शन घेतले व अभिषेक केला. यानंतर त्यांनी खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरास भेट दिली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, नायब तहसीलदार सारिका कदम, पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, गटविकास अधिकारी आर.एस. लाहोटी, पुरातत्व खात्याचे हेमंत हुकरे, मंडळ अधिकारी रेवणनाथ ताठे, तलाठी महाजन यांची उपस्थिती होती.
मेघालयाच्या राज्यपालाची वेरूळ लेणीला भेट
By admin | Updated: June 11, 2016 00:16 IST