शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडाचा टेम्पो उलटला; एक ठार

By admin | Updated: October 17, 2014 23:56 IST

वडोदबाजार : औरंगाबादेत लग्न समारंभ आटोपून अजिंठा गावी परतताना खड्डा चुकविताना वऱ्हाडाचा टेम्पो औरंगाबाद-जळगाव राज्यमार्गावरील पाथ्री गावाजवळ उलटला. या अपघातात मुलगी ठार झाली असून ३५ जण जखमी झाले.

वडोदबाजार : औरंगाबादेत लग्न समारंभ आटोपून अजिंठा गावी परतताना खड्डा चुकविताना वऱ्हाडाचा टेम्पो औरंगाबाद-जळगाव राज्यमार्गावरील पाथ्री गावाजवळ उलटला. या अपघातात एक दहा वर्षीय मुलगी ठार झाली असून जवळपास ३५ जण जखमी झाले. जखमींपैकी ४ ते ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला.अजिंठा येथील जावेद युसूफ शेख या तरुणाचा शुक्रवारी औरंगाबाद येथील चिकलठाण परिसरात विवाह समारंभ झाला. हा विवाह समारंभ आटोपून नातेवाईक टेम्पोने (क्र. एमएच- १५ जी-४८६७) अजिंठा गावी परतत होते. फुलंब्रीहून पुढे आल्यानंतर पाथ्री गावाजवळ रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो विरुद्ध दिशेला जाऊन उलटला. या वाहनात अजिंठा, भराडी, ढालसावंगी, गोद्री व इतर गावांतील नातेवाईक बसलेले होते. टेम्पो उलटल्याने सर्वच जवळपास ३५ जणांना मार लागला. घटनास्थळी पडलेले रक्त, विखुरलेल्या चपला-बुट, जखमींचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. पाथ्री व आसपासच्या नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करून सर्व जखमींना आळंद, फुलंब्री, येथील रुग्णवाहिकेद्वारे घाटीत हलविले. उमाजी सहाने, भागीनाथ म्हस्के, काकासाहेब मोटे, योगेश पाथ्रीकर, सोमीनाथ सोनवणे, भानुदास तायडे, सोमीनाथ करपे यांच्यासह अनेकांनी मदत केली. सपोनि दिलीप सागर, नंदकुमार दांडगे, सोमीनाथ मुरकुटे, वाघमारे, साळवे आदींनी वाहतूक सुरळीत केली.मृत अन् जखमींची नावेया अपघातात शेख आयशाबी शेख सुभान (१२, रा. गोद्री, ता. भोकरदन) या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती अजिंठ्याच्या उपसरपंचांनी दिली.शेख भिकन शेख मस्तान, शेख नदीम शेख कलीम, मुक्तार खाँ बुढन खाँ पठाण, ताहेराबी शेख अब्बास, आशिकी बुढन खाँ पठाण, अहमद इरफान पठाण, शेख भिक्की शेख अहमद (सर्व रा. अन्वा, ता. भोकरदन) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. या सर्व जखमींवर फुलंब्री उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.इतर जखमींवर घाटी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. सर्व जखमींना विविध रूग्णवाहिकांद्वारे दवाखान्यात पोहोचविण्यात आले.औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्यफुलंब्री : औरंगाबाद-जळगाव रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली असून, वाहनधारक त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.औरंगाबाद-जळगाव राज्य रस्ता क्रमांक आठ आहे. ऐतिहासिक अजिंठा लेणीला जाण्यासाठी हा एकमेव सरळ मार्ग आहे. या रस्त्यावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यात पर्यटकांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. औरंगाबाद येथील टी पॉइंट (हर्सूल जेल) पासून हा रस्ता खराब झालेला आहे. नगरपालिकेचा जकात नाका, सावंगी, चौका घाट, गणोरी फाटा, बिल्डानजीक मठपाटी, जुने तहसील कार्यालय, फुलंब्री शहरातून जाणारा रस्ता या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात धोकादायक खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावर बाजार समितीनजीक शुक्रवारी दोन दुचाकीस्वार खड्डा वाचविण्याच्या नादात खाली पडले. हे प्रकार दररोज घडत आहेत. या रस्त्याची काही दिवसांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. (वार्ताहर)