शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

अन्ननलिकेत अडकलेला सेल काढण्यात घाटीच्या डॉक्टरांना यश

By admin | Updated: June 15, 2014 00:54 IST

औरंगाबाद : तान्हुल्या बाळाकडे लक्ष न दिल्यास त्याच्या जीवावर बेतू शकते. लहान मुले खेळत असताना त्यांना दिसेल ती वस्तू ते तोंडात घालत असतात.

औरंगाबाद : तान्हुल्या बाळाकडे लक्ष न दिल्यास त्याच्या जीवावर बेतू शकते. लहान मुले खेळत असताना त्यांना दिसेल ती वस्तू ते तोंडात घालत असतात. अशा वस्तू त्यांच्यासाठी प्राणघातक ठरू शकतात. अशाच एका बाळाने बॅटरीवर चालणाऱ्या गाडीचे सेल गिळल्याची घटना खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे घडली. त्याच्या अन्ननलिकेत अडकलेला सेल बाहेर काढण्यात घाटीतील कान, नाक, घसा विभागातील डॉक्टरांना यश मिळाल्याने चिमुकल्यास जीवदान मिळाले आहे.घाटीतील कान, नाक, घसा विभागप्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी सांगितले की, खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील रहिवासी दर्शन सोपान शेगडे हा दोन वर्षीय बालक ११ जून रोजी बॅटरीवर चालणारी मोटारगाडी खेळत होता. खेळताना बॅटरीचा सेल खाली पडला. काही क्षणांत त्याने तो सेल उचलला आणि तोंडात टाकला.ही बाब दर्शनच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्या तोंडातील सेल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्याने तो गिळला होता. त्यानंतर काही वेळातच त्यास उलट्या आणि संडासचा त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी दर्शनला खुलताबाद येथील खाजगी डॉक्टरांना दाखविले. त्यांनी तपासून घाटीत नेण्याचा सल्ला दिला. बुधवारी रात्री ८ वाजता दर्शनला घाटीतील अपघात विभागात दाखल केले. त्यानंतर कान, नाक, घसा विभागाच्या डॉक्टरांनी त्याला तपासले. दर्शनवर अगोदर उलट्या आणि संडास थांबण्यासाठी औषधोपचार करण्यात आले. गुरुवारी दुपारी बाळाचा एक्स-रे काढण्यात आला. एक्स-रेमध्ये गिळलेला सेल दिसत नव्हता. शेवटी अस्थिव्यंगोपचार विभागातील सी. आर्म या यंत्रावर त्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा सेल कोठे अडकला आहे हे स्पष्टपणे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर दर्शनला आॅपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे त्याच्या अन्ननलिकेत अडकलेला सेल बाहेर काढला. ही प्रक्रिया डॉ. वेदी, डॉ. अनुश्री बजाज, डॉ. स्वाती सावंत, डॉ. आनंद तुळजापूरकर, डॉ. सचिन बनसोड यांनी केली. भूलतज्ज्ञ डॉ. रश्मी बेंगाली यांनी त्यांना सहकार्य केले.