नांदेड : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजमंत्री नितीन गडकरी १२ जानेवारी रोजी नांदेड दौर्यावर येत आहेत.सोमवारी अकोला जिल्ह्यातील पातूर येथून हेलिकॉप्टरने माहूरला दुपारी ४ वा. ४0 मिनिटांनी येणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता रेणुकामातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर अर्धा तास माहूर येथे राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. साडेपाच वाजता हेलिकॉप्टरने नांदेडकडे प्रयाण. ६ वाजता नांदेड विमानतळावर येणार असून सव्वासहा वाजता नागपूरकडे प्रयाण करणार आहेत. /(प्रतिनिधी)
केंद्रीय मंत्री गडकरी आज नांदेडमध्ये
By admin | Updated: January 12, 2015 14:17 IST