लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हर्सूल येथील हरसिद्धी देवीच्या मंदिर परिसरातील कुंडात भाऊ, बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे हर्सूल परिसरात शोककळा पसरली आहे.अनिरुद्ध संदीप पल्लाळ (१२), अनुजा संदीप पल्लाळ (१०), अशी कुंडात बुडालेल्यांची नावे आहेत. हे दोघे बहीण-भाऊ मंदिर परिसरात राहत होते.संदीप पल्लाळ हे ट्रकचालक असून, ते कामाला गेले होते, तर आई घरीच होती. मुले खेळताना कुंडात पडल्याचे कळताच तेथील नागरिकांनी मुलांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला; परंतु कुंडात पाणी पातळी जास्त असल्याने ती बालके मदतकार्य करणा-यांना सापडली नाहीत. थोड्या वेळाने दोघांचे मृतदेह कुंडात तरंगताना दिसल्यानंतर तात्काळ हर्सूल तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अय्युब पटेल यांना नागरिकांनी घटनेची माहिती दिली. पटेल यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून हर्सूल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांना घटनेची माहिती दिली.संदीप पल्लाळ यांचे हर्सूल परिसरातील हरसिद्धी माता मंदिरापासून जवळच घर आहे.
बहीण-भावाचा कुुंडात बुडून दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:19 IST