नांदेड : राज्यावर सध्या दुष्काळाचे भीषण संकट असून दुष्काळी दौर्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी नांदेड जिल्ह्यातून सुरुवात करणार आहेत, अशी माहिती संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी पत्रपरिषदेत दिली.थोरात म्हणाले, सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे हे ६३ आमदारासंह जिल्हा दौर्यावर येणार आहेत. सकाळी १0 वाजता एलबीटीसंदर्भात व्यापार्यांशी चर्चा करतील. त्यानंतर विष्णूपुरी प्रकल्पाची पाहणी, ११ वा. बाभूळगाव येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी सुदाम मोरे यांच्या कुटुंबियांची भेट घेवून उस्मानगर, लोहा मार्गे गंगाखेडला जाणार आहेत. पत्रपरिषदेत आ. हेमंत पाटील यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासमवेत विरोधी पक्ष नेता एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यावेळी दीपकसिंह रावत, बाळासाहेब देशमुख, बंडू खेडकर, तुलजेश यादव आदींची उपस्थिती होती. /(प्रतिनिधी)
उद्धव ठाकरे आज नांदेडात
By admin | Updated: November 24, 2014 12:40 IST