शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

शहरातील नाल्यांवर दोन हजार अतिक्रमणे

By admin | Updated: May 26, 2014 01:17 IST

औरंगाबाद : पालिका आणि महसूल विभागाने केलेल्या पाहणीत नाल्यांवर २ हजार अतिक्रमणे असल्याची माहिती समोर आली.

 औरंगाबाद : पालिका आणि महसूल विभागाने केलेल्या पाहणीत नाल्यांवर २ हजार अतिक्रमणे असल्याची माहिती समोर आली. अतिक्रमणांमुळे नाल्यातून पाणी वाहून न जाता ते वसाहतींमध्ये शिरते. सुमारे अडीच हजार घरांना त्या अतिक्रमणांमुळे फटका बसतो. नाल्यांची पाहणी करून त्यांची हद्द व पात्रांचा नकाशा तयार करण्यात आला. त्यावर मनपाने २० लाख रुपये खर्च केला. मात्र दीड वर्षांपासून एकाही नाल्यातील अतिक्रमण पालिकेने काढलेले नाही. नाल्याचे बॅकवॉटर घरात शिरल्यानंतर अनेक ठिकाणी संसार वाहून जातात. कुटुंब उघड्यावर येते. त्यानंतर मनपा सत्ताधारी, लोकप्रतिनिधींमध्ये आणि प्रशासनात नाल्यांची पाहणी करण्यात चढाओढ लागते. आश्वासनांची खैरात करून सर्व निघून जातात. नालेसफाई पूर्णपणे का होत नाही. अतिक्रमणे का काढली जात नाहीत. याचा कुणीही विचार करीत नाही. नाल्यावरील अतिक्रमणे काढण्यात पालिकेला अपयश का येते, याकडे कुणीही लक्ष देत नाही. औरंगपुर्‍यातील शिवाई ट्रस्ट, श्रीमान श्रीमती, औषधी भवन, सारस्वत व जनता सहकारी बँक, सुराणा कॉम्प्लेक्स, जाफरगेट येथील इमारती मुख्य नाल्यावर आहेत. हे नाले इमारतधारकांनी स्वच्छ करण्याच्या अटीवर बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. तांत्रिक पद्धतीने सफाई होणे गरजेचे आहे. दिवाण देवडी, चुनाभट्टी, गांधीनगर, गुलमंडी, औरंगपुरा या भागांत दरवर्षी नाल्याच्या बॅकवॉटरमुळे भयावह परिस्थिती निर्माण होते. या नाल्यांवर आहेत अतिक्रमणे अल हिलाल कॉलनी, जलाल कॉलनी, खाम नदी़, शहानूरवाडी ते दर्ग्यापर्यंतचा नाला, टाऊन हॉल ते वज्द मेमोरियल हॉलपर्यंत, नारेगाव, ब्रिजवाडी ते चमचमनगरपर्यंतचा नाला, किराडपुरा, इलियास मशीद ते कटकटगेटपर्यंतचा नाला, अल्तमश कॉलनी, एऩ के़पान सेंटर ते पुढे, एमजीएम ते जाफरगेट, बन्सीलालनगर - राजनगर ते जहागीरदार कॉलनी नाला, भानुदासनगर ते झांबड इस्टेट, उस्मानपुरा पोलीस स्टेशन - द्वारकापुरी ते श्रेयनगर नाला, तिरुपती विहार ते चाणक्यपुरीपर्यंतचा नाला, सिल्कमिल कॉलनी ते हमालवाड्यापर्यंत, सादातनगर नाला, पोलीस मेस ते फाजलपुरा, इंदिरानगर दक्षिण भागाकडील नाला, क्रांतीनगर ते सुयोग कॉलनी नाला, अमरप्रीत ते गौतमनगर, गांधीनगर नाला, जयभवानीनगर, शिवाजीनगर नाला, अजम कॉलनी ते शहाबाजार पूल नाला, रमानगर, श्रेयनगर, राठी टॉवर नाला, संजयनगर या नाल्यांवर अतिक्रमणे आहेत. औषधी भवनचा वादग्रस्त नाला दिवाण देवडीतील त्या नाल्यावर औषधी भवन ही इमारत बांधण्यात आली. इमारतधारकाला नालेसफाई करून घेणे बंधनकारक आहे. शहरातील मोठा नाला आहे. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी अशी दिली. प्रश्न - नालासफाई सुरू केली आहे का? उत्तर - हो, नालासफाई सुरू केली आहे. प्रश्न - किती दिवसांत काम संपेल? उत्तर - दोन-चार दिवसांत काम संपेल. प्रश्न - कंत्राटदार कोण आहे? उत्तर - आमचा दरवर्षीचा कंत्राटदार ठरलेला आहे. प्रश्न - किती खर्च करणार सफाईवर? उत्तर - ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च होणार. प्रश्न - मनपाकडे यंत्रणा आहे का? उत्तर - मनपाकडे सफाईची यंत्रणा नाही. प्रश्न - नाल्यावर अतिक्रमणे कशामुळे झाली? उत्तर - महापालिकेच्या आशीर्वादाने झाली. महापालिकेची भूमिका प्रभागनिहाय नाल्यांवरील अतिक्रमणांना नोटीस देण्याची जबाबदारी उपायुक्त किशोर बोर्डे यांच्यासह प्रशासकीय विभागातील अधिकार्‍यांवर आहे. बोर्डे यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाहीत. कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांच्यावर प्रभाग ‘ब’ आणि ‘क’ मधील नाल्यांची, हेमंत कोल्हे यांच्याकडे ‘अ’ व ‘ड’ प्रभागाची, तर सिकंदर अली यांच्याकडे ‘ई’ व ‘फ’ मधील नालेसफाईची जबाबदारी आहे. प्रभाग ‘ब’ व ‘क’ मधील नाल्यांबाबत अभियंंता सिद्दीकी यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अशी. प्रश्न - किती नाल्यांवर अतिक्रमणे आहेत. उत्तर - हे मला निश्चित सांगता येणार नाही. प्रश्न - अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न करणार? उत्तर - नालेसफाई करताना आड येणारे अतिक्रमण काढणार. प्रश्न - आजवर किती अतिक्रमणे काढली? उत्तर - अजून काही काढलेली नाहीत. प्रश्न - अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या का? उत्तर - प्रशासकीय विभागाने नोटीस दिल्या असतील. प्रश्न - नाल्यांवरील अतिक्रमणे किती? उत्तर - २ हजार अतिक्रमणांचा आकडा मनपाकडे आहे प्रश्न - अतिक्रमणांचे नकाशे योग्य आहेत का? उत्तर - अतिक्रमित नाल्यांचे नकाशे नाहीत. प्रश्न - मनपाने पाहणीसाठी किती रुपये खर्च केला? उत्तर - २० लाख रुपयांचा खर्च केला. टेबलवर नकाशा नाल्यांवर असलेल्या अतिक्रमणांचा मनपाने तयार केलेला नकाशा टीएलआर आणि टाऊन प्लॅनिंग विभागाने टेबलवर बसून तयार केल्याचा आरोप नगरसेवक जगदीश सिद्ध यांनी केला. उत्तरे देताना सिद्ध म्हणाले.....नाल्याच्या पात्रात घरे असल्याचा हा पुरावा. कटकटगेटपासून पुढे आलेल्या नाल्यात घरांची बांधकामे झाल्यामुळे नाला अरुंद झाला आहे. पावसाळ्यात अशाच घरांमध्ये पाणी शिरते. शिवाय साथरोगांचा सामना नागरिकांना करावा लागतो. टाऊन हॉल ते नूर कॉलनीकडे जाणार्‍या नाल्याच्या पात्रात अशा पद्धतीने घरे झाली आहेत. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाला वाट मिळाली नाही, तर पाणी घरांत शिरते. शिवाय रस्त्यावर साचते. उच्चभू्र वसाहतींतून गेलेला हा नाला मागील ७ ते ८ वर्षांमध्ये अतिक्रमित होत गेला. पाईप टाकून नाला वळविणे, बंद करण्यासारखे प्रकार झाल्यामुळे त्या नाल्याला पावसाळ्यात महापुराचे रूप येते. नाल्यातच काँक्रीट टाकून बांधकाम केल्याचे या छायाचित्रातून दिसते. हा नाला सिडको-हडकोतून निघून पुढे जाफरगेट, गांधीनगर परिसरातील नाल्याला मिळतो. अतिक्रमणामुळे पावसाळ्यात हा नाला रौद्ररूप धारण करतो.