वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात तीन आठवड्यांपूर्वी घरफोडी करून लाखाचा ऐवज लांबविणाऱ्या दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून ६१ हजार रुपयांचे चोरी केलेले दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.८ जुलै रोजी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार पांडे, सहायक फौजदार सागरसिंग राजपूत, पोकॉ. अनिल पवार, परमेश्वर पायगव्हाणे, विलास वैष्णव, चालक म्हस्के मुंबई- नागपूर हायवेवर गस्तीवर असताना त्यांनी दोन संशयित तरुणांना ठाण्यात आणून विचारपूस केली. त्यांची नावे जुबेरखान शब्बीरखान (३१, रा. परळी, जि. बीड, ह. मु. साजापूर) व गौतमकुमारसिंग जितेश्वर प्रसादसिंग (रा. बिहार, ह. मु. साजापूर) अशी आहेत. चोरीचा ऐवज हस्तगतचोरट्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी तीन आठवड्यांपूर्वी सिडको वाळूज महानगरातील सुनील महादेव माणके (रा. सिडको वाळूज महानगर-१) यांच्या घरी २० जूनच्या मध्यरात्री चोरी केल्याचे कबूल केले. त्यांनी तेथून रोख ३० हजार रुपये, साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंठन, २ हजार रुपयांची साखळी नेली होती. त्यांच्या ताब्यातून ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, पायातील चेन व साखळी असा ६१ हजार ४१४ रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. चोरी करण्यासाठी आरोपींनी वापरलेली दुचाकी (क्रमांक एम.एच.-२४, बी.- ४६२८) जप्त केली आहे. ही दुचाकीही चोरीची असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
घरफोडी करणाऱ्या दोघांना पकडले
By admin | Updated: July 14, 2014 01:04 IST