औरंगाबाद : गजबजलेल्या रेल्वेस्टेशन रोडवरील तंदूर हॉटेलच्या बाजूच्या गल्लीतून चार भामट्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करीत अडीच लाख रुपये रोख रक्कम हिसकावून नेली. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. विशेष म्हणजे नागरिकांनी या चोरट्यांचा पाठलागही केला; परंतु ते चकमा देण्यात यशस्वी ठरले.घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, राकेश वेदप्रकाश शर्मा (रा. देवगिरी बँकेच्या वर, स्टेशन रोड) यांचा अॅल्युमिनिअम व बॉटलचा व्यवसाय आहे. घरापासून काही अंतरावरच असलेल्या तंदूर हॉटेलच्या बाजूच्या गल्लीतच त्यांचे आॅफिस आहे. गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास ते घरातून दोन लाख ५५ हजार ९०० रुपये एका बॅगमध्ये भरून खाली आले. ही बॅग त्यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली आणि दुचाकी घेऊन ते आॅफिसजवळ आले. आॅफिसजवळ गाडी उभी केल्यानंतर पैशांनी भरलेली बॅग त्यांनी डिक्कीतून काढून हातात घेतली.घटनेची माहिती मिळताच क्रांतीचौक ठाण्याचे फौजदार सिद्दीक हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. परिसरात पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला; परंतु ते सापडले नाहीत. या चोरीप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. फौजदार सिद्दीक तपास करीत आहेत.
अडीच लाख रुपये हिसकावले!
By admin | Updated: November 28, 2014 01:16 IST