शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

आठ दिवसात बारा जणांचा अपघातात मृत्यू

By admin | Updated: June 20, 2014 00:44 IST

शिरीष शिंदे , बीड धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग बीड जिल्ह्यातून गेला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर अपघात होणे हे जणू समीकरणच बनले आहे.

शिरीष शिंदे , बीडधुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग बीड जिल्ह्यातून गेला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर अपघात होणे हे जणू समीकरणच बनले आहे. गेल्या आठ दिवसात या रस्त्यावर तिन मोठे अपघात झाले असून या अपघांतामध्ये बारजण ठार झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. हा महामार्ग म्हणजे मृत्यूचा मार्ग बनला आहे की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.बीड शहरापासून आठ ते दहा अंतरावर असलेल्या नामलगाव फाटानजीक १२ जून रोजी उभ्या ट्रकवर जीप आदळून आठजण ठार झाले होते. ही घटना ताजी असतानाच रविवारी सकाळी नाशिक येथील भाविक तुळजापूर येथे देवदर्शनासाठी जाताना बीड तालुक्यातील रौळसगावनजीक जीपला अपघात झाला. या अपघाता दोनजण जागीच ठार झाले होते. त्यातच बुधवारी सकाळी ट्रक-कंटनेरचा अपघात होऊन दोन ठार झाल्याची घटना घडली. या महामार्गावर नेहमी होणाऱ्या अपघातांमुळे या रस्त्यावरुन जाणाऱ्यां प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अपघात सत्र चालूच असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. मोठ्या अपघातांसह दुचाकी अपघात होण्याची संख्या अधिक आहे. काही दिवसापूर्वी बीडहून गढी फाट्यावरुन माजलगावकडे निघालेल्या दुचाकीला रांजणी परिसरात ट्रकने धडक दिली होती. मोठी वाहने दुचाकीला धडक देण्याच्या घटना या धुळे-सोलापूर महामार्गावर यापुर्वी अनेकवेळा घडलेल्या आहेत. आता खऱ्या अर्थाने चौपदरी करणाची गरजधुळे-सोलाप्ूुर महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे यापूर्वी जाहीर झाले आहे. हे काम सुरु ३० जून पर्यंत सुरु होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. या महामार्गावर अधिक अपघात होत असल्याने खऱ्या अर्थाने चौपदरी रस्ता होण्याची गरज निर्माण झाली आहे. अपघात होण्याची संख्या वाढली तर आहेच शिवाय मोठे अपघात होऊन मृतांची संख्याही वाढतच असल्याचे समोर येत आहे. दर दोन ते चार दिवसाला जिल्ह्यातून गेलेल्या महामार्गावर अपघात होत आहेत. भूसंपादनाचे काम सुरुच चौपदरीकरणाच्या कामासाठी प्रशासनाच्यावतीने भूसंपादनाचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हरकती व म्हणणे ऐकून घेऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोठ्या वाहनाने धडकून अपघातांत जखमी होणाऱ्यांची संख्या अधिक जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे ट्रक, कंटेनर, मालवाहू ट्रक या वाहनांची नेहमीच ये-जा असते. लांब टप्पा असल्याने मोठ्या वाहनाचे चालक वेगाने गाड्या चालवितात. रस्ता लहान असल्याने बहुतांश वेळा लहान वाहनधारकांना रस्ता सोडून चालावे लागते. दुचाकी वाहनधारक त्यांच्या मार्गाने योग्य पद्धतीने जात असले तरी त्यांच्यावर धोका कायम असतो. दुचाकीला मागच्या बाजूने मोठ्या वाहनाने धडक दिल्याच्या अनेक घडल्या आहेत. चुकी असो वा नसो या महामार्गावर दुचाकी वाहनधारकांना धोका कायम असतो. अपघातात वाढ होत असल्याने या महामार्गावर चौपदरीकरणाचे काम तात्काळ सुरु होणे आता काळाची गरज बनली आहे. याकडे गांभिर्याने पहाण्याची हीच वेळ असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.