शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

तुळजापुरात राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

By admin | Updated: July 2, 2014 00:22 IST

तुळजापूर : मित्रपक्ष म्हणत असले तरी काँग्रेस कुठल्याही निर्णयप्रक्रियेत राष्ट्रवादीला सोबत घेत नाही.

तुळजापूर : मित्रपक्ष म्हणत असले तरी काँग्रेस कुठल्याही निर्णयप्रक्रियेत राष्ट्रवादीला सोबत घेत नाही. उलट काँग्रेसची भूमिका सातत्याने आघाडीविरोधातच राहिली असल्याचा आरोप करीत आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रसने स्वतंत्रपणे लढण्याची आग्रही मागणी मंगळवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. यावर आपल्या भावना पक्षश्रेष्ठींना कळवू, स्वतंत्रपणे निवणूक लढण्यासाठी ताकदीने मैदानात उतरण्याचा शब्द देत, कार्यकर्त्यांनी त्यासाठी कामाला लागावे असे आदेश माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले. सुमारे सहा तास ही मॅरेथॉन बैठक चालली. तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक मंगळवारी येथील विश्रामगृहावर पार पडली. अध्यक्षस्थानी राणाजगजितसिंह पाटील होते. यावेळी त्यांनी जि. प. गटनिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आढावा घेतला. त्यावेळी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी मित्रपक्ष काँग्रेस नेत्यांच्या कार्यपध्दतीवर वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तुळजाभवानी साखर कारखाना पूर्ण बंद करून अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे दिले. राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसने केल्याचा आरोप करीत, यापुढे राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. याबरोबरच मागील काही वर्षात काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना कशा पध्दतीने डावलले जात आहे. त्याचा पाढाही वाचला. कार्यकर्त्यांच्या भावना ऐकूण घेतल्यावर राणाजगजितसिंह पाटील यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भावनाशी सहमती दर्शवीत आपल्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविण्याचा शब्द दिला. तसेच आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश दिले. यशाला काँग्रेस आणि अपयशाला राष्ट्रवादी जबाबदार ही दूटप्पी भूमिका यापूढे चालणार नाही. असे खडसावत आगामी विधानसभा स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा असे आदेश त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस तालुकाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, अ‍ॅड. दीपक आलुरे, गोकुळ ंिशंदे, प्रभारी नगराध्यक्ष गणेश कदम, विनोद गंगणे, अच्युत वाघमारे, संजय देशमुख, संजय जाधव, विक्रम देशमुख, बलभीम लोंढे, शिवाजी मोटे, दिलीप गंगणे, महेश चोपदार, शिवदास कांबळे, सिद्धू कोरे, नय्यर जहागीरदार यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)