सिल्लोड : दुभाजकाचे काम करीत असलेल्या मजुराला ट्रकने चिरडल्याची हृदयद्रावक घटना औरंगाबाद - जळगाव महामार्गावरील लिहाखेडी - खेळणा फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी घडली. तालुक्यातील मुखपाठ येथील दिलीप चंदन जाधव (३८) असे अपघातात ठार झालेल्या मजुराचे नाव आहे.
औरंगाबाद - जळगाव महामार्गाचे काँक्रिटीकरण सुरू आहे. सिल्लोड तालुक्यातील मुखपाठ येथील दिलीप चंदन जाधव हे नेहमीप्रमाणे शनिवारी लिहाखेडी - खेळणा फाट्याजवळ दुभाजकाचे काम करीत होते. तेव्हा औरंगाबादकडून जळगावकडे जाणारा मालट्रक (एमएच २० डीई १५२५) अतिशय वेगात आला आणि दुभाजकाचे काम करीत असलेल्या जाधव यांच्या अंगावर गेला. त्यात दिलीप जाधव हे चिरडले गेले. या अपघाताची अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. ट्रकचालकास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राजू राठोड, राजू बरडे करीत आहेत.
------------
कॅप्शन
: दिलीप चंदन जाधव यांचा पासपोट फोटो