नवीन नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व विष्णूपुरी नांदेड येथील इंदिरा कॉलेज आॅफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सहयोग^-२०१४’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये नांदेड जिल्ह्याला एकूण ४५ पारितोषिके मिळाली़ यामध्ये सर्वसाधारण विजेतेपद लातूरच्या दयानंद महाविद्यालयाने तर उपविजेतेपद राजर्षी शाहू महाविद्यालयाने पटकाविले आहे.विष्णूपुरी येथील सहयोग सेवाभावी संस्थेच्या परिसरात २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव झाला़ शास्त्रीय गायन कलाप्रकारात नांदेडच्या एम.जी.एम. संगणकशास्त्र महाविद्यालयाने द्वितीय आणि लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.शास्त्रीय तालवाद्यामध्ये नांदेड येथील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. सुगम गायन (भारतीय ) या कलाप्रकारात लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने प्रथम तर नांदेडच्या यशवंत महाविद्यालय व एम. जी. एम. संगणकशास्त्र महाविद्यालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सुगम गायन (पाश्चात्य) मध्ये नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला़ समूह गायन- (भारतीय) मध्ये नांदेडच्या एम. जी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालय व यशवंत महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला़ समूह गायन- पाश्चात्यमध्ये प्रथम क्रमांक नांदेड येथील गुरूगोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेने तर द्वितीय एम. जी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाने मिळविला़ लोकनृत्यामध्ये प्रथम- दयानंद कला महाविद्यालय, लातूर, द्वितीय- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर तर तृतीय क्रमांक नांदेडच्या नेताजी सुभाषचंद्र महाविद्यालयाने आणि वैयक्तिक नृत्यामध्ये द्वितीय- स्वारातीम विद्यापीठ परिसर नांदेड तर तृतीय - प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड़ आदिवासी नृत्य - या कलाप्रकारामध्ये नांदेडच्या प्रतिभा निकेतन महाविद्यालयाने प्रथम तर तिसरा क्रमांक सिडकोच्या इंदिरा गांधी महाविद्यालयाने मिळविला़ उत्कृष्ट एकांकिका स्पर्धेत नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाने प्रथम क्रमांक तसेच एकांकिका (उत्कृष्ट दिग्दर्शन) स्पर्धेतही प्रथम क्रमांक नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाने पटकावला आहे़ उत्कृष्ट अभिनय (स्त्री) मध्ये नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाच्या अंजली कंधारकर हीला तृतीय क्रमांक मिळाला़ उपरोधिक- विडंबन अभिनयमध्ये प्रथम क्रमांक स्वारातीम विद्यापीठ परिसर, नांदेड़ मूकअभिनयात प्रथम- स्वारातीम विद्यापीठ परिसर नांदेड, द्वितीय- देगलूर महाविद्यालय देगलूर, तृतीय- अभिनव अध्यापक महाविद्यालय, लातूर. नकला स्पर्धा- प्रथम- स्वारातीम विद्यापीठ परिसर, नांदेड़ वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक नांदेडच्या एम. जी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालय तर द्वितीय यशवंत महाविद्यालय़ वक्तृत्व स्पर्धा- प्रथम- एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड़ काव्यवाचन- प्रथम- स्वारातीम विद्यापीठ परिसर नांदेड तर द्वितीय- एम. जी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड. कथाकथन स्पर्धा- प्रथम- यशवंत महाविद्यालय, द्वितीय- कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शंकरनगऱ चित्रकला- द्वितीय- एसजीजीएस अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालय, नांदेड.कोलाज व व्यंग चित्रकलेत नांदेडच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला़ स्थळ छायाचित्रामध्ये प्रथम- स्वारातीम विद्यापीठ परिसर, नांदेड तर तृतीय क्रमांक शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर. पोवाडा- द्वितीय- स्वारातीम विद्यापीठ परिसर, नांदेड, तृतीय- दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर. लावणी- द्वितीय- एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड तर , तृतीय- कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शंकरनगर. भारुड द्वितीय- स्वारातीम विद्यापीठ परिसर, नांदेड तर तृतीय- एम. जी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड.वासुदेव- प्रथम- यशवंत महाविद्यालय, नांदेड तर तृतीय- स्वारातीम विद्यापीठ परिसर, नांदेड. भजन- द्वितीय- यशवंत महाविद्यालय नांदेड़ फोक आॅर्केस्ट्रॉ- द्वितीय- एम.जी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड़ शोभायात्रा- प्रथम- एम.जी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड, द्वितीय- माधवराव पाटील महाविद्यालय, पालम, तृतीय- सहयोग फार्मसी महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेड व कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, शंकरनगर. युवक महोत्सवामध्ये आयोजित स्पर्धांमध्ये काही प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिके हिंगोली, परभणी आणि लातूरच्या महाविद्यालयानी पटकावली आहेत़ (वार्ताहर)
नांदेड जिल्ह्याला एकूण ४५ पारितोषिके
By admin | Updated: October 1, 2014 00:34 IST