शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

टोल फ्री नंबर झाले मुके

By admin | Updated: July 7, 2014 00:10 IST

सोमनाथ खताळ , बीड सार्वजनिक आरोग्य सेवेसह अन्य अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासनाने टोल फ्री क्रमांक दिलेले आहेत.

सोमनाथ खताळ , बीडसार्वजनिक आरोग्य सेवेसह अन्य अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासनाने टोल फ्री क्रमांक दिलेले आहेत. पोलिस, आरोग्य विभाग, आपत्कालीन विभाग, फायर ब्रिगेड, एस.टी. महावितरण, चाईल्ड लाईन आदी विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास अत्यावश्यक सेवा देण्याचे वचन आहे. या वचनानुसार शनिवार आणि रविवार या दोन दिवसात टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून हे क्रमांक सतर्क आहेत का? याची पाहणी केली. यामध्ये महसूल विभागाचा आपत्कालीन परिस्थितीवर उपाय करण्यासाठी असलेला टोल फ्री नंबर बधीर अवस्थेत होता. रिंग जात होती, मात्र पलीकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. तर दुसरीकडे एस.टी. चाईल्ड लाईन, आरोग्य विभागाकडून तात्काळ प्रतिसाद मिळाला. तर बीड शहरात छेडछेडीला आळा बसविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वेगवेगळ्या दोन पथकातील चिडीमार पथक सजग असल्याचे दिसून आले तर गस्त पथकाने चक्क अरेरावीची भाषा करीत फोन कट केला. या सर्व घटना ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये आढळून आल्या.गस्ती पथकाची अरेरावीची भाषाछेडछाड रोखण्यासाठी गस्त पथकाचीही स्थापना करण्यात आलेली आहे. या पथकातील ९८५०९९१८१० क्रमांकावर आम्ही शनिवारी रात्री संपर्क केला. पहिल्या वेळेस मनीषा राऊत यांनी फोन उचलला. त्यांना चिडीमार सारखीच अडचण सांगितली. राऊत यांनी आम्ही गेवराईला तपासासाठी आलो असल्याचे सांगितले, आम्ही मदत करण्याची विनंती केल्यानंतर राऊत यांनी मी शिवाजी नगर ठाण्याला कळविते आणि कोणाला तरी पाठविते असे सांगितले. त्यानंतर आम्ही पुन्हा दहा मिनिटांनी संपर्क केला असता, पथकातीलच दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याने फोन उचलला. पुन्हा या कर्मचाऱ्याने आमच्याकडून ‘बे एक बे’ चा पाढा वाचून घेतला. ती मुलगी आता पाच मिनिटात येथून जाते. तिला खूप त्रास होतो असे सांगितल्यावर, त्यांनी आवाज चढवला आणि म्हणाल्या आम्ही तपासासाठी आलेलो आहोत, समजत नाही का सांगितलेले? शिवाजी नगर ठाण्यात अर्ज देण्यास सांगितला तर दिला का? आम्ही गाडीत आहोत, बीडला आल्यावर ‘तुला बीडला आल्यावर फोन करतोत, ठेव आता, रेंज नाही अगोदरच, आम्ही गाडीत आहोत’. परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला असता, ‘तू कोण आहेस रे जरा अ‍ॅडव्हान्सच बोलतोय हा’ यासारखे अनेक अरेरावीचे शब्द उच्चारले. याचे कॉल रेकॉर्डींगही ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे. या पथकातील त्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे सर्वसामान्यांशी बोलणे उचित आहे का? अशा कर्मचाऱ्यांना लोकसेवक म्हणता येईल का? सर्वसामान्यांशी उद्धटपणे बोलण्याचा अधिकार त्यांना दिलाच कोणी? यासारखे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.इमर्जन्सी वैद्यकीय सेवा नेहमीच 'अलर्ट'रविवारी सकाळी ११:३० ला १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केला़ एका महिलेने फोन उचलला आणि नमस्कार केला़ आम्ही त्यांना प्रसुतीसाठी एक महिलेला वेदना होत असल्याचे सांगितल़े़ त्यांनी तात्काळ वडवणीच्या आरोग्य विभागाशी संपर्क जोडून दिला़ डॉ़ऋषिकेश कवचट यांनी अवघ्या १५ मिनिटात आलोत, असे सांगितले़ यावरुन आरोग्य विभाग सजग दिसला.फायर ब्रिगेड, आपत्कालीन 'मुकेच'फायर ब्रिगेड आणि आपत्कालीन विभाग हे दोन्ही विभाग कोणतीही मोठी घटना आटोक्यात आणण्यासाठी महत्वाची भूमीका बजावत असतात़ मात्र रविवारी या दोन्ही विभागाच्या टोल फ्र्री क्रमांकावर संपर्क साधला असता केवळ रिंगच ऐकावयास येत होत्या़ समोरून कोणीही फोन उचलला नाही़ त्यामुळे हे दोन्ही विभाग सतर्क नसल्याचे आम्हाला आढळून आले़रा.प.म.कडून स्थानिक पातळीवर माहिती$$्र्रिपरिवहन विभागाच्या १८००२२१२५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केला असता तो झाला नाही. मात्र स्थानीक पातळीवरील ०२४४२-२२२३२८ या क्रमांकावर संपर्क केला असता बीड बसस्थानकातून सत्तार खान या वाहतूक नियंत्रकानी फोन उचलून नमस्कार केला. त्यांना औरंगाबाद गाडी कधी असते, असे विचारल्यावर प्रत्येक १५ मिनीटाला आहे, असे सांगितले.‘जीवनामृत’ची माहिती मिळाली, पण रक्त नाही़़़राज्य शासनाने जीवनामृत रक्तपुरवठा ही अत्यंत महत्वाची योजना २६ डिसेंबर २०१३ साली सुरू केली़ सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीतून ही योजना सुरू आहे़ ४० किमी अंतराच्या आत असलेल्या अत्यावस्थ स्थितीतील रूग्णांना टोल फ्री क्रमांकावरूनच रक्तपुरवठा करण्याची ही योजना आहे़ १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास मदत दिली जाते़ यावरून आम्ही १२ वाजता हा क्रमांक डायल केला़ नमस्कार केल्यानंतर त्यांनी आमचे, पेशंटचे, रूग्णालयाचे नाव विचारून ब्लड ग्रुप कोणता व कधी पाहिजे असे विचारले़ बी पॉझीटीव्ह ब्लड ग्रुप असून दुपारी पाहिजे आहे, असे सांगितले़ त्यांनतर त्यांनी संबंधीत बँकेला संपर्क करून रक्तपुरवठा करण्यासंदर्भात सांगतोत असे सांगितले़ त्यानंतर २० मिनिटाने आम्हाला परत फोन आला व बी पॉझीटीव्हचे रक्त उपलब्ध नसल्याचे सांगितले़ उपलब्ध झाल्यास लगेच सांगू व ७४९३ हा नोंदणी क्रमांक देऊन पुढील काही बोलण्याच्या आत त्यांनी फोन कट केला़ फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला मात्र याचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. कारण फोनवर बोलणारी व्यक्ती (महिला) ही बाजूच्या व्यक्तीशी गप्पा मारत मारत बोलत होती़ बाजूची व्यक्ती मोठमोठ्याने हसत असल्याने आवाज बरोबर येत नव्हता़चाईल्ड लाईनवालेआले धावतचाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर आम्ही सकाळी ११:४० ला संपर्क केला़ त्यांनी नमस्कार करून नाव विचारून काय मदत हवी आहे, असे विचारले़ आम्ही बीड बसस्थानकात एक तीन ते चार वर्षाचा अनोळखी मुलगा रडत असल्याचे सांगितले़ त्यांनी आमची टीम दोन मिनीटात येईल असे सांगितले. दुसऱ्याच मिनिटाला बीड चाईल्डलाईनचे तत्वशील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते यांनी आमच्याशी संपर्क साधून पत्ता विचारला व थेट आमच्याजवळ आले.चिडीमार आले आरसीपी जवानांना घेऊनमुली आणि महिलांच्या छेडछाडीला आळा बसावा, यासाठी शहरात दोन पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. चिडीमार पथकातील ८४८५०५२६७० या क्रमांकावर आम्ही शनिवारी रात्री ९ च्या सुमारास संपर्क साधून शिवाजी नगर भागात एका मुलीची छेड निघत असल्याचे सांगितले. त्यांनी आमचे नाव विचारले. त्यांनतर चिडीमार पथकातील मीरा रेडेकर आणि सरोज बीडकर या दोन महिला पोलिस कर्मचारी ६ आरसीपी जवानांना घेऊन अवघ्या पाच मिनिटात केएसके महाविद्यालयासमोर आल्या. त्यांच्या सतर्कतेचे आम्ही स्वागत केले. त्यांना हकीकत सांगितल्यावर त्यांनी कधीही फोन करा आम्ही सतर्कच असतो सांगितले.महावितरणने फोन उचलला, पण....महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केला असता फोन उचलण्यात आला. मात्र समोरून कोणीही बोलले नाही. दोन वेळेस संपर्क केला असता यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती.पोलिसांचा नंबर लागलाच नाहीपोलिस नियंत्रण कक्षातील असणाऱ्या १०० या टोल फ्री क्रमांकावर रविवारी दिवसभर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तो दिवसभरात एकदाही लागला नाही.