बीड: बीड जिल्ह्याचा संघर्षशाली नेता म्हणून गोपीनाथराव मुंडे यांची ओळख़ हा संघर्षशाली नेता गमावल्याचे दु:ख बीड जिल्ह्यालाचा नव्हे तर अवघ्या देशाला झाले आहे़ त्यांच्या जाण्याने बीड जिल्हा पोरका झाला असल्याने, अनेक छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांचे छत्रच हरवले आहे़ बुधवारी या संघर्षशाली नेत्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले़ या अंत्यसंस्काराचे वृत्त माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात येत होते़ हे वृत्त पाहण्यासाठी टीव्ही समोर बसलेल्या अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही आपले अश्रू अनावर झाले़ पंकजा पालवे यांनी मुखाग्नी दिल्यानंतरचे जे वृत्त होते ते खरोखरच सर्वांच्या काळजाला स्पर्श करून गेले़ ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले केंद्रीय मंत्री यांचे मंगळवारी सकाळी अपघातात निधन झाले़ त्यांच्या अपघाताची बातमी प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आली़ खरं म्हणजे कोणाचेच या वृत्तावर विश्वास बसत नव्हता़ मात्र ज्यावेळेस डॉक्टरांनी मराठवाड्याच्या लाडक्या नेत्याला मृत घोषित केले, यावेळेस सर्वांचे काळीज या वृत्ताने फाटले़ जो तो या नेत्याच्या निधनाच्या बातमीची खात्री करून घेत होता़ निधनाची खात्री पटताच कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडण्यास सुरूवात केली़ आभाळाएवढे दु:ख बीड जिल्ह्यालाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला सहन न होणारे होते़ जो तो कार्यकर्ता मंगळवारी सकाळपाूसनच टिव्हीसमोर बसलेला होता़ या कार्यकर्त्यांना ना अन्न गोड लागत होते, ना भूक लागत होती़मुंडे यांचे प्रत्येक ठिकाणचे चित्रण माध्यमे टिपत होती़ हे चित्र पाहण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता असुसला होता़ जेवण-खाण सगळे टीव्हीसमोरच करीत होते़ मात्र कार्यकर्ते खरे भावनिक झाले ते मुंडेंचे शव लातूरहून परळीला आल्यानंतरच़ आपल्या लाडक्या नेत्याला आपण कधी पाहू, याची उत्सुकता टीव्हीसमोरच्या कार्यकर्त्यांना लागली होती़ बीड जिल्ह्यात तर लहान मुलांपासुन ते वृद्धांपर्यंत व शेतकर्यांपासून ते व्यापार्यांपर्यंतचे सर्वच लोक बुधवारी दिवसभर टिव्हीसमोर ठाण मांडून होते़ मुंडे यांचे शव हेलीकॉप्टरने परळीत दुपारी १२ च्या सुमारास दाखल झाले़ आपल्या या नेत्याचे शव खाली कधी उतरेल आणि त्यांचा चेहरा कधी पहायला मिळेल, यासाठी प्रत्येकाच्या नजरा टीव्हीकडे लागल्या होत्या़ अखेर या आसुसलेल्या नजरा थांबल्या त्या मुंडे यांचे शव अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतरच़ मंत्री, नेते, कार्यकर्ते, शेतकरी आदींची गर्दी, पोलिसांचा बंदोबस्त यामुळे तेथील वातावरण टीव्हीसमोरच्या कार्यकर्त्यांना समजत होते़ जणू काही ज्वलंत चित्रच डोळ्यासमोर उभे राहत होते़ ज्यावेळेस मुंडे यांचे शव पार्थिवावर ठेवण्यात आले व कन्या आ़ पंकजा पालवेंनी मुखाग्नी दिला त्यावेळेस मात्र टीव्ही पाहणार्यांचा संयम सुटला आणि ते सुद्धा धाय मोकलून रडायला लागले़ तर काहीजण हुंदके देत आपले अश्रु पुसत स्वत:ला सावरत होते़ अंत्यदर्शंनसाठी झालेली गर्दी पाहून व तेथील वातावरण या लोकांना स्पष्ट दिसत होते, खरोखरच हे वातावरण ह्रदय हेलावणारे होते़ (प्रतिनिधी)लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचे डोळे दिवसभर टीव्हीकडेच शेतकर्यांनीही केली नाहीत दिवसभर कामे व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवून वाहिली श्रद्धांजली अंत्यदर्शनानंतर टीव्हीसमोरच्या कार्यकर्त्यांना झाले अश्रू अनावर प्रत्येक घरात पाळला जातोय दुखवटा
टीव्ही पाहणार्यांनाही अश्रू झाले अनावर...
By admin | Updated: June 5, 2014 00:11 IST