शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

माथेफिरूंनी पेटविली तीन वाहने अन् रसवंती

By admin | Updated: June 12, 2014 01:35 IST

औरंगाबाद : बुधवारी रात्री सिडको एन-९ येथील रंजनवन हौसिंग सोसायटीमधील एक मोटारसायकल, दोन कार आणि एक रसवंती पेटवून देण्यात आली

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी, बजाजनगर या वसाहतीत वाहने जाळण्याच्या घटना सतत घडत असताना बुधवारी रात्री सिडको एन-९ येथील रंजनवन हौसिंग सोसायटीमधील एक मोटारसायकल, दोन कार आणि एक रसवंती पेटवून देण्यात आली. या घटनेत मोटारसायकल जळून खाक झाली, तर अन्य वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे.सिडकोतील रंजनवन हौसिंग सोसायटीतील रहिवासी गणेश अरविंदराव व्यवहारे यांनी त्यांची बजाज डिस्कव्हर मोटारसायकल (क्रमांक जीजे-१५ एलएल-३७६२) मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घरासमोर उभी करून ठेवली. रात्री सव्वावाजेच्या सुमारास मास्क घालून आलेल्या समाजकंटकांच्या टोळक्याने त्यांच्या मोटारसायकलचे सीट फाडले आणि आग लावली.गणेश यांनी घटनेच्या काही तास आधीच २०० रुपयांचे पेट्रोल भरलेले होते. त्यामुळे इंजिनला पेट्रोलचा पुरवठा करणारी नळी काही क्षणात जळून खाक झाली आणि टाकीतील पेट्रोलने पेट घेतला. त्यावेळी मोठा आवाज झाल्याने गणेश आणि त्याचे आई-वडील जागे झाले. ते घराबाहेर आले तेव्हा त्यांची मोटारसायकल पेटलेली दिसली. त्यांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दोन्ही चाक, सीटसह संपूर्ण गाडी जळून खाक झाली. आरोपींनी याच सोसायटीत राहणाऱ्या डॉ. हरिश्चंद्र झिंजुर्डे पाटील यांच्या स्विफ्ट कार (क्रमांक एमएच-२० बीएन-२६९६) ला लाग लावली. गाडीने लवकर पेट घ्यावा यासाठी त्यांनी कारच्या पेट्रोल टाकीजवळील टायरला आग लावल्यामुळे मडगार्डने पेट घेतला. झिंजुर्डे यांच्या घराशेजारी राहणारे तिळवे कुटुंब हे गच्चीवर झोपलेले होते. त्यांनी पाणी आणून आग विझविण्यास सुरुवात केली. डॉ. झिंजुर्डे यांच्या गल्लीतच राहणाऱ्या नारायण कुलकर्णी यांची ह्युंदाई कारही पेटविण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्यांच्या चाक आणि मडगार्ड पेटवून देण्यात आले. ही आग तातडीने विझविण्यात आली. आरोपींनी एन-९ येथील धनवई हॉस्पिटलसमोरील एक रसवंती यंत्राला गुंडाळण्यात आलेल्या गोणपाटासह पेटवून दिली. ही आगही लोकांनी विझविली. वाळूज महानगरमध्ये रात्री उशीरा वाहने पेटवून देण्याचे प्रकार घडत आहेत. या गुन्हेगारांचा शोध लागू शकलेला नाही.पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेटघटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक गोरख चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.