शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

हजार शाळा संरक्षण भिंतीविना !

By admin | Updated: July 5, 2014 00:42 IST

संजय कुलकर्णी, जालना जिल्हा परिषदेच्या एक हजार शाळांना संरक्षण भिंतीच नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली

संजय कुलकर्णी, जालनाजिल्हा परिषदेच्या एक हजार शाळांना संरक्षण भिंतीच नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली असून, जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक या सरकारी शाळांच्या जागा अतिक्रमणांनी व्यापू लागल्या आहेत. तर काही शाळांच्या जागेचा वापर खाजगी साहित्य टाकण्यासाठी होऊ लागला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जन कार्यावर त्याचा विपरित होतो आहे.दरम्यान, ग्रामीण भागात काही ठिकाणी या प्रकारामुळेच शाळांतील मुख्याध्यापक शिक्षकांचे या अतिक्रमणकर्त्यांबरोबर वाद-विवादाचेही प्रसंग घडत असल्याचे सूत्रांनी सांगितले.या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १५१४ शाळा आहेत. यात १४८२ प्राथमिक तर ३२ माध्यमिक शाळांचा समावेश आहे. या शाळांनी ठिक ठिकाणी मोठ्या जागा मिळाल्या आहेत. विशेषत: ग्रामीण भागात शाळांचा आवार मोठा आहे. ग्रामपंचायतींनी मोठ्या उदात्त हेतून तसेच भविष्यातील विस्तार ओळखून शाळांकरिता जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र काही शाळांची इमारती मर्यादित जागेवर उभ्या आहेत.त्यामुळे त्या त्या ठिकाणी शाळांच्या विस्तारीकरणात मोठ मोठे अडथळे उदभवू लागले आहेत. विशेषत: वर्ग खोल्यांचा प्रश्न भेडसावतोय आहे. त्यातच आता शाळेभोवती संरक्षक भिंतीच नसल्यामुळे काही शाळांच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे थाटली आहेत. मोकळ्या जागेचा वापर कडबा टाकणे, जनावरे बांधणे, शेतीचा माल टाकणे इत्यादी कामांसाठी होत आहे. शाळेची जागा वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. बहुतांश शाळा मुख्य रस्त्यावर आहेत. यामुळे धोका आहे.पक्क्या पण तुटलेल्या आवार भिंतीपक्क्या पण तुटलेल्या आवार भिंती असलेल्या शाळांची संख्या ५६ एवढी आहे. यापैकी बऱ्याच शाळांच्या संरक्षण भिंतींच्या दुरूस्तीचे काम या ना त्या कारणाने रेंगाळले. तुटलेल्या संरक्षण भिंतींमुळे येथील सुरक्षितता धोक्यात आली आहे. दुरूस्तीच्या कामांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे देण्यात आल्याचे काही मुख्याध्यापकांकडून सांगण्यात येते. तारेचा कुंपणाचा आधार१२२ शाळांना तारेचे कुंपण करून शाळेचे संरक्षण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तारेचे कुंपणही अनेक ठिकाणी निघालेले आहे. त्यामुळे जनावरे तेथे जात आहेत. अशा शाळांच्या ठिकाणी नव्याने संरक्षण भिंतीचे काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. काही शाळांना झाडांचे कुंपण२६८ शाळांना झाडांचे कुंपण करण्यात आले आहे. अशा शाळांमधील शिक्षकांच्या प्रयत्नाने शाळेच्या जागेभोवती झाडे लावून संरक्षण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अशा ठिकाणची काही झाडेही उन्मळून पडलेली आहेत. आवार भिंत नसलेल्या शाळाआवार भिंती नसलेल्या शाळांची संख्या ६३९ एवढी आहे. यापैकी काही शाळा वर्दळीच्या रस्त्यांवर आहेत. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी एकाच वेळी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. काही विद्यार्थी पळत सुटतात, त्यामुळे अशा शाळांभोवती आवार भिंतीची गरज आहेअ. अर्धवट आवार भिंतीअर्धवट आवार भिंती असलेल्या शाळांची संख्या ९६ एवढी आहे. अशा शाळांच्या आवार भिंतीचे काम सुरू झाले होते. मात्र ते काही कारणाने बंद पडले. काही शाळांचे अर्धवट काम नंतर वर्षानुवर्षे पूर्ण झालेच नाही. त्यामुळे अशा शाळांभोवतीच्या आवार भिंतीचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. केवळ २ शाळांचे काम सुरूजिल्ह्यात केवळ २ शाळांच्या आवार भिंतीचे काम सुरू आहे. वर्गखोल्यांच्या दुरूस्तीची कामे ज्याप्रमाणे हाती घेण्यात आली, त्याप्रमाणे शाळांच्या आवार भिंतीची कामेही करावीत, अशी अपेक्षा ग्रामीण भागात पालकांमधूनही व्यक्त केली जात आहे.निधीची गरजजिल्ह्यात पक्की आवार भिंती असलेल्या शाळांची संख्या ३२९ एवढी आहे. एकूण शाळांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहे. ज्या ठिकाणी पक्क्या आवार भिंती आहेत, तेथील शाळांची रंगरंगोटीही बऱ्यापैकी झालेली आहे. यापैकी बहुतांश शाळांना प्रवेशद्वार असून ते शाळेच्या वेळेतच उघडे असते. याबाबत जि.प.च्या शिक्षण व आरोग्य सभापती वर्षाताई देशमुख म्हणाल्या की, १००९ शाळांना संरक्षण भिंती नाहीत. या शाळांच्या संरक्षण भिंतीच्या कामांसाठी ७० ते ८० कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे हे एकाचवेळी होणारे काम नाही. मात्र नाविन्यपूर्ण योजनेतून या कामासाठी निधी गरजेचा आहे