चंदनझिरा : जालना येथील नवीन मोढ्यातील एका गोदामातून सरकीचे ३८ पोते चोरून घेवून जाणाऱ्या दोघांना वाहनासह अटक करण्यात आली.शनिवारी रात्री नवीन मोढ्यातील अजयकुमार रामेश्वर लोहिया यांच्या गोदामातून शेख असिम शे. सलिम व अफराज खान कादर खान (रा. मंगल बाजार ) या दोघांनी एका पिकअप वाहनात गोदामातील चोरीचे पोाते टाकले होते. चंदनझिरा पोलीस ठाण्याचे बिट मार्शल बिरकायलू यांनी रात्रीच्या गस्त मध्ये त्या दोघांना हटकले. तेव्हा त्यातील एक जण तेथून फरार झाला होता.तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी लोहिया यांच्या फि र्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली आहे. अधिक तपास हे. कॉ. वाघमारे करीत आहे.
गोदामातून सरकीचे ३८ पोते चोरणाऱ्यास अटक
By admin | Updated: July 20, 2015 00:51 IST