रविवारी शहरात ‘उमेद’ प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंसहायता समूह सदस्य/समूह संसाधन व्यक्ती यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्तार बोलत होते. पुढे ते म्हणाले, लोकसंख्येच्या प्रमाणात रेशन दुकानांची संख्या वाढवून रिक्त रेशन दुकाने महिला बचत गटांना देऊ असे ते म्हणाले. तर ५ हजार महिलांना तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने रोजगाराच्या संधी निर्माण करून त्यांना किमान ५० हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी ‘उमेद’ प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रकल्प संचालक संगीता पाटील यांनी सांगितले. यावेळी सिल्लोड पं. स. सभापती डॉ. कल्पना जामकर, प्रतिभा जाधव, नगराध्यक्षा राजश्री निकम, रेखा वैष्णव, दीपाली भवर, मेघा शाह, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना तालुकाप्रमुख देवीदास लोखंडे, कृउबाचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती काकासाहेब राकडे आदी उपस्थित होते.
(फोटो : सिल्लोड येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यशाळा प्रसंगी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार व उपस्थित मान्यवर.
270621\img-20210627-wa0321.jpg
फोटो कैप्शन :
सिल्लोड येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यशाळा प्रसंगी मार्गदर्शन करीत असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार. यावेळी व्यासपीठावर पं. स. सभापती कल्पना जामकर, प्रतिभा जाधव, नगराध्यक्षा राजश्री निकम, प्रकल्प संचालिका संगीता पाटील आदी दिसत आहेत.