शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

राष्ट्रवादीचे थाळीनाद आंदोलन

By admin | Updated: October 27, 2015 00:21 IST

लातूर : दिवसेंदिवस महागाई वाढत असून, या वाढत्या महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी शासन कोणतेही पाऊल उचलत नाहीत़

लातूर : दिवसेंदिवस महागाई वाढत असून, या वाढत्या महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी शासन कोणतेही पाऊल उचलत नाहीत़ त्यामुळे अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या शासनाच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ किरकोळ किंमत निर्देशांक दरमहा वाढत असून, आॅगस्ट २०१५ मध्ये ३़७४ असलेला हा दर सप्टेंबर अखेर ४़४१ टक्केवर गेला आहे़ अन्नधान्य महागाईचा निर्देशांक २़२० टक्के एवढा होता़ तो सप्टेंबर अखेर ४ टक्केवर गेला आहे़ दाळीच्या किंमत वाढीचा दर जवळपास ३० टक्क्यावर गेला आहे़ दाळी व तेलबियाच्या साठेबाजीस प्रतिबंध करणारा आदेश शासनाने २०१० मध्ये लागू केला होता़ तो या सत्ताधारी शासनाने उठविला़ परिणामी, व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात साठेबाजी करण्यास वाव मिळाला आहे़ त्यामुळे व्यापाऱ्यांना भाववाढीला सामोरे जावे लागत आहे़ राज्य मंत्रीमंडळांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात २ रुपये दरवाढ तसेच इतरही वस्तुंवर करवाढ करण्याचा निर्णय घेतला़ यावर शासनाचं कुठलही नियंत्रण नाही, अन्न-धान्य, भाजीपाला, औषध, एस़टी़बस, टॅक्सी, रिक्षा प्रवास तसेच इतरही जिवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने गोर-गरिब व सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ राज्यात जिवनावश्यक वस्तुंचे विशेषत: दाळीचे भाव वाढले आहेत़ चार महिन्यांपूर्वी ८० रुपये किलो असणारी दाळ आज २२५ रुपये किलो झाली आहे़ या भाववाढीस शासन जबाबदार आहे़ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राईस मॉनिटरींग सेल स्थापन करावा, लातूरमध्ये जमिनीतील पाणीपातळी खोल गेली असल्यामुळे २०० फुट खोलीच्या विंधन विहिरीची बंदी उठवून ती ४०० फुटापर्यंत करुन द्यावी, बांधकाम मजुरीवर असलेल्या मजुरांचा आकडा ३५ ते ४० हजारांवर असलेल्या पाण्यांची उपलब्धता असणाऱ्या व्यक्तींना बांधकामाचे परवाने द्यावेत़ त्यामुळे मजुरांना मजुरी मिळणार आहे़ यासह इतर मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, आ़ विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहरजिल्हाध्यक्ष मकरंद सावे, जिल्हा कार्याध्यक्ष बबन भोसले, शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, प्रदेश सचिव अशोक गोविंदपूरकर, संजय बनसोडे, प्रदेश सदस्य डी़एऩ शेळके, विक्रम कदम, एऩबी़ शेख, मदन काळे, बख्तावर बागवान, माजी शहर जिल्हाध्यक्ष मुर्तूजा खान, शैलेश स्वामी, सय्यद इब्राहिम, श्रीकांत सूर्यवंशी, विनोद रणसूभे, रेखा कदम, विशाल आवडे, विभाकर मोटे, महेश देवणे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)