शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

दहा तलाव कोरडेठाक

By admin | Updated: July 4, 2014 00:16 IST

तामलवाडी : पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने तुळजापूर तालुक्यातील पाण्याने तळ गाठला आहे.

तामलवाडी : पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने तुळजापूर तालुक्यातील पाण्याने तळ गाठला आहे. विहिरीचा पाणीसाठा कमी झाल्याने व पाऊसही नसल्याने नगदी समजले जाणारे उसाचे पीक वाळून जाऊ लागले असून, सद्यस्थितीत तामलवाडी परिसरातील दहा साठवण तलावही कोरडेठाक पडले आहेत.मृगात पाऊस होऊन खरिपाची पेरणी होईल, अशी अपेक्षा बाळगून शेतकऱ्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण केली. मात्र, दीड महिन्यापासून पाऊस झाला नाही. कडक उन्हामुळे तलावातील उपलब्ध पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे. त्यात सांगवी, माळुंब्रा, सावरगाव, धोत्री, केमवाडी, काटी, दहिवडी, कदमवाडी या साठवण तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. वाफेबांधणी करून ठेवलेला ऊसही पाण्याअभावी जागेवर वाळून जात आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचा पाणीसाठा कमी झाला असून, परिसरातील अनेक गावांत आता टंचाईच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. पावसाअभावी परिसरात अद्याप एक टक्काही खरिपाची पेरणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे खरीप हंगाम पुरता वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर)जलस्त्रोत अधिग्रहणाचे सोळा प्रस्ताव दाखलतुळजापूर : तुळजापूर तालुक्यात दिवसेंदिवस टंचाईची तीव्रता वाढत आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील विविध गावांतून जलस्त्रोत अधिग्रहणासाठी १६ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले असून, यातील सात प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. तालुक्यात उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाई जाणवली नसली तरी पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटत असताना अद्याप पाऊस झाला नसल्याने जून-जुलैमध्ये टंचाईची परिस्थिती गंभीर बनल्याचे दिसत आहे. सध्या सुरतगाव, यमगरवाडी, हगलूर, येडोळा, वडाचा तांडा, कोरेवाडी, किलज येथे विंधन विहिरींचे अधिग्रहण मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय बसवंतवाडी, जळकोटवाडी (नळ), मर्टा आणि शिराढोण येथून प्रस्ताव दाखल झाले आहे. पंचायत समिती प्रशासनाकडे अद्याप टँकरची मागणी आली नसली तरी यापुढील काळात जेथून मागणी येथील तेथे तातडीने टँकर मंजूर करण्यात येणार असल्याचे उपसभापती प्रकाश चव्हाण यांनी सांगितले. ऊस करपू लागलातुळजापूर तालुक्यातील अणदूर परिसरात सध्या पाण्याअभावी ऊस करपत असल्याचे दिसत आहे. अणदूर परिसरात सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली आहे. मार्च ते मे महिन्यापर्यंत बोरी धरणातून पाणी सोडल्याने सुरूवातीला उसाचा पाणीप्रश्न निर्माण झाला नाही. मात्र, अद्याप पाऊस झाला नसल्याने व विहिरीतील पाणी पातळीने तळ गाठल्याने हातातोंडाशी आलेले पीक करपत असल्यचे दिसत आहे. याशिवाय पावसाला विलंब झाल्याने तालुक्यातील खरिपातील उडीद, मूग या पिकांचे अस्तित्वही धोक्यात आले असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. बंदी असतानाही कडबा विक्रीजनावरांना चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याबाहेर चारा विक्रीस प्रतिबंध केला आहे. असे असतानाही या भागातून राजरोसपणे चारा विक्रीसाठी बाहेर जातअ सल्याचे दिसत आहे. पाऊस असाच लांबत राहिल्यास या भागात पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.