शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

शिक्षक पतीकडून शिक्षिकेचा छळ

By admin | Updated: June 15, 2014 00:54 IST

औरंगाबाद : दोघेही पती-पत्नी एका शाळेत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना संस्कृतीचे धडे देतात;

औरंगाबाद : दोघेही पती-पत्नी एका शाळेत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना संस्कृतीचे धडे देतात; पण स्वत:च्या घरात आचरण करताना मात्र ‘संस्कृती कोणत्या गाढवीचे नाव’, असे म्हणत शिक्षक पतीने आपल्या पत्नीला रात्रभर बेदम मारहाण करीत तिचा गळा दाबून जिवे मारण्याचाही प्रयत्न केला. तिचा पती किरण देहाडे (२४) हा काल रात्री १२ वाजेपासून सकाळी ९ वाजेपर्यंत तिला मारत होता. सिडको ठाण्याचे निरीक्षक राजकुमार डोंगरे यांना ही माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तिला घाटीत दाखल केले. सदरील शिक्षिकेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला जात होता. काल घर बांधकामासाठी माहेरून ५ लाख रुपये आणले नाहीत म्हणून हडको परिसरातील श्रीकृष्णनगर येथे तिचा अनन्वित छळ केला. आज पीडित शिक्षिकेच्या संयमाचा बांध सुटला आणि तिने सिडको पोलिसांना आपल्या शिक्षक पती व सासरच्या मंडळींचे कारणामे सांगितले. अंगावर सर्वत्र मारहाणीच्या खुणा पाहून काही वेळ पोलीसही चक्रावून गेले. या प्रकरणी स्वाती किरण देहाडे (२४) हिच्या तक्रारीवरून पती किरण देहाडे, सासू, सासरा, नणंद आदींसह एकूण १० जणांविरुद्ध सिडको ठाण्यात भादंवि ४९८ व ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.