येणेगूर : भरधाव वेगातील टँकर व कारची समोरासमोर जोराची धडक होवून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला़ ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दस्तापूर (ता़उमरगा) शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर घडली़ मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा येथून तुळजापूरकडे जाणारी कार कार (क्ऱएम़एच़२५- आऱ ३४४२) व सोलापूरहून उमरग्याकडे तेल घेवून जाणाऱ्या टँकरची (क्ऱएम़एच़२५- बी़ ९०९०) मंगळवारी सायंकाळी दस्तापूर गावाजवळ समोरासमोर धडक झाली़ या अपघातात कारचालक श्रीधर केशवाचार्य मुरूमकर (वय-४२ रा़ उमरगा) हे जागीच ठार झाले़ तर उषा श्रीधरराव मुरूमकर, ऋचा संदीप देशपांडे व श्रीनिवास संदीप देशपांडे हे तिघे जखमी झाले़ येणेगूर दूरक्षेत्राचे पोहेकॉ विजयानंद साखरे, मनोज सूर्यवंशी, दिगंबर सूर्यवंशी, महादेव शिंदे आदीनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना उपचारासाठी पाठविले़ टँकरचालक फरार झाला असून, याबाबत मुरूम पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ तपास सपोनि विलास गोबाडे, विजयानंद साखरे हे करीत आहेत़ (वार्ताहर)
टँकर-कार धडकेत एक जण जागीच ठार
By admin | Updated: February 14, 2016 00:07 IST