शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

तलाठी हजर; दलालांचा पोबारा!

By admin | Updated: June 28, 2014 01:17 IST

जालना : बहुतांश तलाठ्यांनी वेळेवर आप-आपल्या सज्जात दाखल होत, लगबगीने ग्रामस्थांची कामे हातावेगळी करण्यास सुरूवात केली.

जालना : बहुतांश तलाठ्यांनी वेळेवर आप-आपल्या सज्जात दाखल होत, लगबगीने ग्रामस्थांची कामे हातावेगळी करण्यास सुरूवात केली. तर अनेक ठिकाणी कार्यरत असलेल्या दलालांनी पोबारा केल्याचे चित्र शुक्रवारी बहुतांश सज्जावर आढळून आले.लोकमतने गुरूवारी स्टींग आॅपरेशन करून जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ६० तलाठी सज्जांची प्रत्यक्ष पाहणी केली. या स्टींग आॅपरेशनमध्ये निवडलेल्या तलाठी सज्जांपैकी बहुतांश तलाठी कार्यालये कार्यालयीन वेळेत बंद होती. काही कार्यालयांवर तलाठ्यांनी परस्पर नेमलेले दलालच मानेइतबारे कारभार पाहत असल्याचे आढळून आले. ग्रामस्थही दलालांनाच साहेब म्हणत त्यांच्याकडूनच कामे उरकतांना दिसत होते. काही ठिकाणी एकाच कार्यालयात अनेक सज्जांचे कामकाज सुरू होते. एका तलाठ्यावरच पाच-सहा सज्जांचा पदभार आहे. काही तलाठ्यांना मंडळ अधिकारी पदाचाही अतिरिक्त पदभार आहे. या सर्व धक्कादायक बाबी समोर आल्या. या स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना किती अडचणींचा सामना करावा लागतो, यावर पूर्णपान प्रकाशझोत टाकण्यात आला. शुक्रवारी वृत्त प्रकाशित होताच महसूल प्रशासनासह तलाठी खडबडून जागे झाले. कार्यालयाकडे आठवड्यातून एकदाच येणारे तलाठी शुक्रवारी कार्यालयीन वेळेत हजर झाले. आपल्यानंतर लगबगीने ग्रामस्थांची कामे करण्यास सुरूवात केली. ज्या ठिकाणचा कारभार संपूर्णपणे दलालांच्या हातात होता, त्याही ठिकाणी तलाठी हजार झाले. आपल्या पंटरांना काढून देत स्वत:च कामे हाती घेतली. अनेक ठिकाणच्या दलालांनी पोबारा केल्याचे पहावयास मिळाले.दरम्यान, भोकरदन तालुक्यातील बहुतांश कार्यालयात तलाठी वेळेत हजर झाले. भोकरदनच्या तलाठ्यांनी आपला लॅपटॉप तात्काळ दुरूस्त करून घेतला. सकाळपासूनच ग्रामस्थांची कामे करण्यास प्रारंभ केला.कुंभारपिंपळगाव, घनसावंगी, वाटुरफाटा, आष्टी, तळणी, टेंभूर्णी, अकोलदेव येथील कार्यालयातही आज कार्यालयीन वेळेत तलाठी आपल्या कामात व्यस्त असल्याचे निदर्शनास आले.ग्रामस्थांतून समाधानशेतकरी, ग्रामस्थांसह विद्यार्थी छोट्या-मोठ्या कामांनिमित्त तलाठ्यांच्या शोधार्थ फिरत असतात. गावात तलाठी येत नाहीत, तालुक्यालाही ते भेटत नाहीत, त्यांचे मोबाईलही बंद असतात. त्यामुळे ग्रामस्थांची अनेक कामे खोळंबलेली असतात. सध्या पीक कर्जाचे वितरण सुरू आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यान्ना सातबारा तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी तलाठ्याची नितांत गरज पडत आहे. या पार्श्वभूमीवर स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून तलाठी, दलाल यांच्या कारभाराचे वास्तववादी चित्र समोर आणल्याबद्दल विविध ठिकाणच्या ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)तलाठी खडबडून जागे!शुक्रवारच्या अंकात स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून वास्तव चित्र दाखविल्यानंतर महसूल प्रशासन आणि तलाठी खडबडून जागे झाले. जिल्ह्यातील बहुतांश सज्जा कार्यालयांमध्ये तलाठी दाखल झाले. ग्रामस्थांची कामे हातात घेतली.