अकोलादेव: जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथून जवळच असलेल्या गोंधनखेडात संत जनार्दन स्वामी गौरीशंकर आश्रमाच्या गोशाळेचा २०० गाईना आधार मिळाला आहे.दोन वर्शापूर्वी तालुक्यात भीषण दुष्काळ पडला होता. पशुपालकांना आपले पशुधन वाचविण्यासाठी नाकीनऊ आले होते. अशा परिस्थितीत अनेग पशुपालकांनी आपले पशुधन या गौशाळेत आनले होते. याठिकाणी आश्रमाच्यावतीने गोशाळा बांधण्यात आली.गोंधनखड्यात नावाप्रमाणेच पूर्वीपासून प्रत्येक घरामध्ये गायीचा सांभाळ करण्याची प्रथा आहे. त्यावरून या गावाचे नाव गो-धन खेडा असे पडले असल्याचे जुने जाणकार सांगतात. त्यामुळेच आश्रमाच्यावतीने गोशाळा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुष्काळात शेतकऱ्यांनी आपल्यागायी या आश्रमात दान केल्याहोत्या. या ठिकाणी चारा पाण्याची सोय करण्यात आली. गायींची देखभाल करण्यासाठी तीन गुराख्याची मानधनावर नियुक्ती करण्यात आली. गायींच्या शेणखतातून मिळणाऱ्या पैशाने चाऱ्याची व्यवस्था करण्यात येते. सध्या तालुक्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना आपल्या जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत गोंधनखेड्यातील या गौशाळेत सुमारे दोनशे गायींचा चांगल्या प्रकारे सांभाळ होत असल्याने शेतकऱ्यांकडून संस्थानचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)
दोनशे गायींचा आश्रमाच्या गोशाळेत सांभाळ
By admin | Updated: July 15, 2014 00:56 IST