शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

तहसीलदार, बीडीओ आज भेट देणार

By admin | Updated: June 18, 2014 01:44 IST

जालना : अंबड तालुक्यातील डोमलगाव येथे ग्रामस्थांनी आपल्यावर बहिष्कार टाकल्याचा आरोप मातंग समाजाने केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या गावात तातडीने समाजकल्याण उपायुक्तांमार्फत चौकशी केली.

जालना : अंबड तालुक्यातील डोमलगाव येथे ग्रामस्थांनी आपल्यावर बहिष्कार टाकल्याचा आरोप मातंग समाजाने केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या गावात तातडीने समाजकल्याण उपायुक्तांमार्फत चौकशी केली. मंगळवारी दोन गटातील स्वतंत्र बैठक घेऊन वाद नियंत्रणात आणल्याचा दावा करण्यात आला आहे. गावातील वाद जवळपास नियंत्रणात असून याबाबतचा अहवाल आपण जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असल्याचे समाजकल्याण उपायुक्त बी.एन. वीर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. दरम्यान, अंबडचे तहसीलदार व गटविकास अधिकारी हेही बुधवारी डोमलगाव येथे भेट देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ९ जून रोजी गावात मातंग समाजातील एका बारा वर्षीय मुलीचा विनयभंग झाला होता. याच घटनेमुळे गावात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली. सदर घटनेतील आरोपीस पोलिसांनी अटक केली. सध्या आरोपी पोलिस कोठडीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र या प्रकरणानंतर गावात सामाजिक तेढ निर्माण झाले. मातंग मुक्ती सेनेचे नेते अशोक साबळे यांनी सोमवारी जालन्यात पत्रकार परिषदेत डोमलगाव येथे ग्रामस्थांनी मातंग समाजावर बहिष्कार टाकल्याचा आरोप करून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या गावाचा संयुक्त दौरा करण्याची मागणी केली होती.यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी गावातील परिस्थितीचा अंदाज घेऊन चौकशीसाठी समाजकल्याण उपायुक्त बी.एन. वीर यांना पाठविले होते. वीर यांनी गावातील काही मंडळींच्या स्वतंत्र बैठका घेऊन सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ - साबळेजालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मातंग समाजावरील अन्याय, अत्याचारात वाढ झाली असून प्रशासनाकडून आरोपींविरुद्ध ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप मातंग मुक्ती सेनेचे नेते अशोक साबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. नानेगाव येथे सरपंच मनोज कसाब यांचा खून झाला. येणोरा येथे कलाबाई लक्ष्मण थोरात या महिलेचे घर गावगुंडांनी जाळले, दाई अंतरवाली येथे समाजातील एका मुलीवर बलात्कार झाला. डोमलगाव येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. यातील तीन घटना पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात घडल्या, असा आरोपही साबळे यांनी केला.या अन्याय, अत्याचाराविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा साबळे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन समाजकल्याण उपायुक्तांकडे सादर करण्यात आले.