शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

शहरात टाहो, रस्त्यावर धो-धो

By admin | Updated: June 8, 2014 01:15 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी अक्षरश: वाहून जात आहे.

सुनील कच्छवे , औरंगाबादशहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी अक्षरश: वाहून जात आहे. पैठणपासून औरंगाबादपर्यंत जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली असून, त्यातून हे पाणी अहोरात्र बाहेर पडत आहे. जायकवाडी धरणातून उचलल्या जाणाऱ्या पाण्यापैकी दररोज तब्बल ४० दशलक्ष लिटर म्हणजे एक चतुर्थांश पाणी गळतीमुळे रस्त्यातच वाया जात आहे.औरंगाबाद शहरात महिनाभरापासून अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही शहरवासीयांना पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. अनेक भागांत चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पाण्यासाठी खाजगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. जायकवाडीपासून औरंगाबादपर्यंत जलवाहिनीच्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मनपाच्या ७०० मि. मी. आणि १४०० मि. मी. व्यासाच्या दोन्ही जलवाहिन्यांना ३० पेक्षा जास्त ठिकाणी गळती लागली आहे.भर उन्हात रस्त्याशेजारी डोहमनपाच्या दोन्ही जलवाहिन्या पैठण रोडच्या बाजूने गेलेल्या आहेत. जलवाहिन्यांच्या गळतीमुळे या रस्त्याशेजारी अनेक ठिकाणी भर उन्हाळ्यातही पाण्याचे मोठमोठे डोह साचले आहेत. काही ठिकाणी हे पाणी रस्त्याच्या बाजूने वाहताना दिसत आहे. जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधूनही पाण्याचे मोठमोठे फवारे बाहेर पडत आहेत. मागील कित्येक वर्षांपासून ही गळती सुरू असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. मात्र, मनपा प्रशासनाने तीव्र पाणीटंचाई जाणवत असतानाही या गळत्या थांबविलेल्या नाहीत. शहराजवळील महानुभाव आश्रमापासून ते पैठण शहरापर्यंत रस्त्यालगत ठिकठिकाणी जलवाहिनीतून पाणी गळती लागली आहे. कांचनवाडी, वाल्मी, गेवराई तांडा, अलाना कंपनी, चित्तेगाव, बिडकीन, ढोरकीन आदी ठिकाणी ही गळती सुरू आहे.मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणातून सध्या दररोज १५० ते १५५ दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. मात्र यापैकी १२५ दशलक्ष लिटर पाणीच शहरापर्यंत पोहोचते. उर्वरित ३० दशलक्ष लिटर पाणी जलवाहिनीच्या गळतीमुळे वाटेतच वाया जाते. ही गळती इथेच थांबत नाही तर शहरातही अंतर्गत जलवाहिन्यांच्या गळतीमुळे आणखी १० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे दररोज केवळ ११५ दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते.