आलेगाव: पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथील रेशन धान्य विक्रेता लाभार्थ्यांना शासनाच्या दराप्रमाणे धान्य देत नसल्याची तक्रार येथील सरपंचाने तहसीलदारांकडे केली होती़ या तक्रारीची दखल घेत दुकानाचा परवाना निलंबित करून लाभार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.येथील स्वस्त धान्य विक्रेत्याकडे मागील पंचवीस वर्षांपासून स्वस्त धान्य दुकान आहे़ परंतु, मागील काही दिवसांपासून शासनाच्या दराप्रमाणे ए़पी़एल़, बी़पी़एल़ व अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जात नव्हते़ तसेच कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नव्हती़ त्यामुळे लाभार्थी रेशनच्या स्वस्त धान्यापासून वंचित राहत होते़ त्यामुळे येथील सरपंच कावेरी सवराते, सोसायटीचे चेअरमन साहेबराव सवराते, कैलास सवराते, रूपेश सोनटक्के, तुकाराम सवराते, माधव देशमुख आदींनी १५ फेब्रुवारी रोजी पूर्णा तहसीलदाराकडे सदर रेशन दुकानदाराविरुद्ध तक्रार तक्रार केली होती़ या तक्रारीची दखल घेत तहसीलदारांनी चौकशी करून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविला होता़ जिल्हा पुरवठा विभागाने २६ फेब्रुवारी रोजी सदर स्वस्त धान्य दुकान व केरोसीन वाटपाचा परवाना निलंबित केला आहे़ लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पिंपळा भत्या येथील स्वस्त धान्य विक्रेत्याकडे व्यवस्था केली आहे़ (प्रतिनिधी)
रेशन धान्य दुकानाचा परवाना निलंबित
By admin | Updated: March 1, 2016 23:53 IST