शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

‘सर्वोपचार’मध्ये संशयित दाखल

By admin | Updated: February 3, 2015 00:58 IST

लातूर : लातूर येथील शासकीय सर्वोपचार रूग्णालयात स्वाईन फ्ल्यू संशयित एक रुग्ण सोमवारी दाखल झाला आहे़ त्याला ताप, सर्दी आणि डोकेदुखीचा त्रास असल्याने

लातूर : लातूर येथील शासकीय सर्वोपचार रूग्णालयात स्वाईन फ्ल्यू संशयित एक रुग्ण सोमवारी दाखल झाला आहे़ त्याला ताप, सर्दी आणि डोकेदुखीचा त्रास असल्याने उपचारासाठी सर्वोपचारमधील आयसोलेटेड वार्डात दाखल करण्यात आले आहे़ शिवाय, एका खाजगी रुग्णालयातही स्वाईन फ्ल्यूने गंभीर असलेल्या एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. आता सीमा भागात हे लोण पसरले असून, एका २४ वर्षीय महिलेला बीदरमध्ये स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.लातूरच्या शासकीय सर्वोपचार रूग्णालयात असलेल्या आयसोलेटेड वार्डात चाकूर येथील एक संशयित रूग्ण उपचारासाठी दाखल झाला आहे़ त्या रूग्णांवर योग्य ते उपचार सुरू असल्याचे रूग्णालय सूत्रांनी सांगितले़ शिवाय, दोन दिवसांपूर्वी लातूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूने गंभीर असलेला रुग्ण दाखल आहे. त्याच्यावर यशस्वी उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. बीदर येथील एक २४ वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी हैद्राबादला गेली होती़ तिथे ती खरेदीसाठी वर्दळीच्या बाजारपेठेत फिरली़ चार दिवसांपूर्वी ही महिला बीदरला परत आल्यानंतर तिला फणफणून ताप भरला़ उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर रक्त व थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते़ त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात ती एच१एन१ या विषाणू संसर्गाने बाधित असल्याचे म्हटले आहे़ त्यास आरोग्य विभागानेही दुजोरा दिला आहे़ या अहवालानंतर विषाणूंचा फैलाव होऊ नये यासाठी तातडीने आरोग्य विभागाने संबंधित रुग्ण महिलेस तिच्या घरी हलविले असून, आवश्यक उपचार व काळजी घरातच घेण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)स्वाईन फ्ल्यूचा ‘एच-१ एन-१’ व्हायरस लातूर जिल्हा व परिसरात सक्रिय झाला आहे. शेजारील बीदर जिल्ह्यातही या साथीचे लोण पसरले असून, आरोग्य अधिकाऱ्याच्या एका २४ वर्षीय मुलीला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे़ तिच्यावर बीदरमध्ये शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत़