शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

‘सुवर्ण’ कन्येच्या स्वागतातही कंजुषी !

By admin | Updated: February 14, 2016 00:08 IST

उस्मानाबाद : दक्षीण आशियायी खो-खो स्पर्धेत बांग्लादेशविरूध्दच्या अंतीम सामन्यात ताकद पणाला लावून भारतीय संघाला टीमची कर्णधार आणि उस्मानाबादची कन्या

उस्मानाबाद : दक्षीण आशियायी खो-खो स्पर्धेत बांग्लादेशविरूध्दच्या अंतीम सामन्यात ताकद पणाला लावून भारतीय संघाला टीमची कर्णधार आणि उस्मानाबादची कन्या सारिका काळे हिने सुवर्णपदक मिळवून दिले़ केवळ उस्मानाबादचीच नव्हे तर देशाची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविणारी ही ‘सुवर्ण कन्या’ गुरूवारी पहाटे उस्मानाबादेत दाखल झाली. मात्र, तिचा जंगी सत्कार करण्याचा विसर सर्वांनाच पडला़ सोशल मीडियावर शनिवारी झालेल्या चर्चेनंतर अनेकांना जाग आली़ आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिचा सत्कार केला़ शाळेकडूनही तिच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले असून, अनेक सामाजिक संस्थांनीही आता तिच्या सत्काराची जोरदार तयारी सुरू केली आहे़श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये प्राथमिक, माध्यमिकचे धडे घेणारी सारिका काळे वयाच्या १५ - १६ व्या वर्षापासून खो-खो खेळते़ स्पर्धा मग त्या शालेय असोत किंवा संघटनांच्या वतीने घेणाऱ्या असोत सारिका काळे हिची टीम या स्पर्धेत आपले वर्चस्व गाजवित होती आणि गाजवित आहे़ दमदार खेळाच्या बळावर सारिकाला महाराष्ट्राच्या टीमचे तीनवेळा कर्णधार म्हणून निवडण्यात आले होते़ दक्षिण आशियायी स्पर्धेसाठी देशातील ३० जणींची निवड झाली होती़ यात उस्मानाबादच्या सारिका काळे आणि सुप्रिया गाढवे या दोन मुलींची निवड झाली होती़ या शिबिरानंतर सुप्रियाची निवड संघात झाली नाही़ पण सारिकाची केवळ निवडच झाली नाही तर तिला भारतीय खो-खो संघाची कर्णधार म्हणून निवडण्यात आले़दक्षिण आशियायी स्पर्धेत प्रथमच खो-खोचा समावेश करण्यात आला होता आणि या खो-खोच्या टीमचे कर्णधारपद सारिकाच्या रूपाने उस्मानाबादला मिळाले होते़ खो-खोच्या इतिहासात भारतीय खो-खो टीमची प्रथम कर्णधार म्हणून सारिकाचे नाव राहणार यात शंका नाही़ सारिकाने कर्णधाराची भूमिका बजावत टीमला सोबत घेवून श्रीलंका, पाकिस्तान, भूतान आणि अंतीम सामन्यात बांग्लादेशच्या टीमवर मात केली आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिले़ देशाला सुवर्णपदक मिळवून इतिहास रचणारी सुवर्णकन्या गुरूवारी पहाटे उस्मानाबादेतील रेल्वेस्थानकावर प्रशिक्षक डॉ़ चंद्रजित जाधव यांच्या समवेत दाखल झाली़ त्यावेळी तिचे वडील सुधाकर काळे, आई सुलोचना काळे, भाऊ सागर यांच्यासोबत गोविंद लोमटे आणि दयानंद जटनवरे हे तिचे स्वागत करून तिला घेण्यासाठी गेले़ मात्र, उस्मानाबादेत दाखल झालेल्या सुवर्ण कन्येच्या सत्कारासाठी गुरूवारी दिवसभरच नव्हे तर शुक्रवारीही युवा सेनेचे काही पदाधिकारी वगळता इतर कोणी लोकप्रतिनिधी अथवा संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकारी फिरकले नाहीत़ सुवर्ण कन्येकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे ‘वाट्सअप’च्या विविध ग्रुपवर शनिवारी सकाळपासूनच चर्चा सुरू झाली़ चर्चेत सहभागी झालेल्या प्रत्येकाने सारिकाच्या सत्काराबाबत नियोजन आखण्यास सुरूवात केली़