शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

मद्य पार्टीत झिंगलेले विद्यार्थी प्राचार्यांच्या स्वाधीन

By admin | Updated: June 9, 2014 01:04 IST

औरंगाबाद : सिडको पोलिसांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ठाण्यात बोलावून मद्य पार्टीत झिंगलेले विद्यार्थी त्यांच्या स्वाधीन केले.

औरंगाबाद : सिडको पोलिसांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ठाण्यात बोलावून मद्य पार्टीत झिंगलेले विद्यार्थी त्यांच्या स्वाधीन केले. ७ विद्यार्थिनी व २३ विद्यार्थ्यांनी ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’मध्ये निवड झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हर्सूल टी-पॉइंट येथील सुरे रेस्टॉरंटमध्ये पार्टी आयोजित केली होती. हाय प्रोफाईल विद्यार्थ्यांची रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती निरीक्षक राजकुमार डोंगरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी फौजदार गोरख चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. या पथकामार्फत सुरे रेस्टॉरंटवर छापा मारण्यासाठी अतिशय गुप्तता पाळण्यात आली. फौजदार चव्हाण व पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हॉटेलवर छापा मारला. त्यावेळी तेथे रेव्ह पार्टी नसून दारूच्या नशेत झिंगलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळाल्याबद्दल जल्लोष करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणी करण्यासाठी एका बसद्वारे घाटी हॉस्पिटलमध्ये नेले. रात्री १ वाजता या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली. त्यानंतर पोलिसांनी त्या सर्वांना सिडको ठाण्यात नेले. तेथे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यानंतर प्राचार्य व व्यवस्थापकास बोलावून त्यांच्याकडे विद्यार्थी सुपूर्द करण्यात आले. पोलिसांनी यावेळी हॉटेलमालक लक्ष्मण फुलचंद सुरे व नोक र अखिल राजसिंग सुरे आणि नील परेश या तिघा जणांना अवैधरीत्या दारूचा गुत्ता चालविण्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली.