कळंब: बसमध्ये चढणार्या इसमाची बॅग कापून तब्बल सव्वासहा लाख रूपयांचे २१ तोळे सोने व जनरल दुकानाचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी पावणेतीन लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना शुक्रवारी पहाटे व शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कळंब शहरात घडल्या़ तर तालुक्यातील ईटकूर शिवारातील शेतातील गोठ्यात बसलेल्या वृद्धस मारहाण करून लूटल्याची घटना घडली असून, नागरिकांनी त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे़ उस्मानाबाद, उमरगा शहरातही चोरट्यांनी हात साफ केला आहे़ पोलिसांनी सांगितले, कळंब शहरातील दत्तनगर परिसरात राहणारे नंदकिशोर बब्रुवान भोंडवे (उदगीर येथील जि़प़बांधकाम उपविभागात कार्यरत) यांनी शनिवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास शहरातील उस्मानाबाद जनता बँकेच्या लॉकरमधून सव्वा सहा लाख रूपये किंमतीचे २१ तोळे सोन्याचे दागिने काढले़ हे दागिने घेऊन ते कळंबहून परळीला जाण्यासाठी बसस्थानकावर आले़ दुपारी १२़३० वाजण्याच्या सुमारास सातारा-जिंतूर या बसमध्ये ते चढले़ त्यावेळी गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी भोंडवे यांच्याकडील रेक्झीन बॅगमधील हे सव्वासहा लाखाचे दागिने लंपास केले़ जवळपास दहा मिनिटांनी भोंडवे यांच्या लक्षात ही बाब आली़ त्यांनी ती बस थेट कळंब पोलिसांत आणली़ मात्र, तत्पूर्वीच गर्दीचा फायदा घेवून चोरट्यांनी पोबारा केल्याने पोलिसांच्या हाती काही लागले नाही़ या प्रकरणी भोंडवे यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि आऱडी़पांचाळ हे करीत आहे़ ईटकूर येथील केसरबाई धर्मराज माने (वय-६५) ही वृध्द महिला शनिवारी दुपारी आपल्या शेतातील गोठ्यात थांबली होती़ दुपारच्या सुमारास गोठ्यात आलेल्या एका इसमाने त्या एकट्या असल्याचे पाहून पाठीमागून डोक्यात दगडाने मारहाण केली़ तसेच केसरबाई माने यांच्या तोंडावरही त्याने दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले़ त्यानंतर त्यांच्या अंगावरील काही दागिने घेवून त्याने तेथून पळ काढला़ गंभीर जखमी केसरबाई यांनी त्याच अवस्थेत बाहेर येवून आरडाओरड केली़ त्यावेळी शेतात काम करीत असलेला त्यांचा मुलगा दत्तात्रय माने व इतर नातेवाईकांनी त्या इसमाचा पाठलाग करून पकडले़ यात दत्तात्रय माने किरकोळ जखमी झाला़ संतप्त जमावाने चोरट्यास चोप देत दोरखंडाने बांधले़ घटनेची माहिती मिळताच पं. स. उपसभापती लक्ष्मण आडसूळ, श्रीकांत सावंत, दत्तात्रय आडसूळ यांनी धाव घेवून पोलिसांना माहिती दिली़ पोनि चंद्रकांत सावळे यांनी तत्काळ पोलिसांना पाठवून त्यास ताब्यात घेतले़ तर गंभीर जखमी केसरबाई माने यांना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ (वार्ताहर) परिसरात खळबळ गावच्या शिवारात गोठ्यात बसलेल्या केसरबाई माने यांच्यावर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला केल्याच्या घटनेने इटकूर व परिसरात खळबळ उडाली आहे़ पोलिसांनी परिसरातील चोर्यांच्या घटना रोखून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़ जनरल दुकानाचे गोदाम फोडले कळंब शहरातील बालाजी मंदिर परिसरातील मारवाडी गल्ली भागात गोपाळ विष्णूदास जाजू यांचे जनरल दुकानाचे गोडावून आहे़ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गोडावूनचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला़ आतील मसाला पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, जामून पावडर आदी २ लाख, १९ हजार, ५८ रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याप्रकरणी गोपाळ जाजू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि मिर्झा बेग हे करीत आहेत़ पोलिसांचे आवाहन कळंब शहर व परिसरात चोर्या, घरफोडीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी, याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे़ बाहेरगावी जाताना किंमती सामान, पैसे घरात ठेवू नका, शेजार्यांना कल्पना द्या, घराच्या परिसरात पुरेसा प्रकाश ठेवा, प्रवास करताना दागिने घालणे टाळा, संशयितांची माहिती द्या आदी आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांनी केले आहे़
चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
By admin | Updated: May 10, 2014 23:51 IST