शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

पिंपळ्याच्या कदम कुटुंबाची फरफट सुरुच

By admin | Updated: January 8, 2015 00:57 IST

तामलवाडी : शेतात नव्याने घेतलेला बोअर आठ दिवसात गाळाने बुजला.

तामलवाडी : शेतात नव्याने घेतलेला बोअर आठ दिवसात गाळाने बुजला. यासाठी अडीच लाखाचे घेतलेले कर्ज कशाने फेडायचे. या चिंतेने नानासाहेब गेनदेव कदम (रा. पिंपळा खु.) यांनी २४ एप्रिल २०१४ रोजी गळफास लावून आत्महत्या केली. अचानक पती गेल्याने विमलला धक्का बसला. कसेबसे सावरत दोन मुलांसाठी जगावं लागणार हे समजून १० महिन्यापासून दु:ख आवरत अडचणींवर मात करीत कदम कुटुंब जीवन जगत आहे. शासनाकडून अद्यापही दमडीचीही मदत मिळालेली नाही.शेतकरी नानासाहेब कदम यांच्या पश्चात २ मुले, पत्नी असा परिवार आहे. तीन एकर माळरान, खडकाळ जमीन त्याच जमिनीतून मिळणाऱ्या उत्पादनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. नानासाहेब खाजगी कारखान्यात हंगामी कामावर जात. शेती बागायती व्हावी म्हणून त्यांनी एकत्रीत कुटुंबात असतानाच बोअर घेतला. त्यासाठी तामलवाडी येथील महाराष्ट्र बँकेकडून साडेतीन लाखाचे कर्ज घेतले. बोअर खोदाईही केली, पाणी लागले. मोटार बसविण्यासाठी आठ दिवस लागले तोवर संपूर्ण बोअर गाळाने बुजला. नंतर मोटार बाहेर काढून बोअर फुरळणी केली व मोटार सोडली. थोडे दिवस पाणी मिळाले. पुन्हा गाळात मोटार अडकून तुटून निघाली. त्यात बोअरचे पाणी गायब झाले. पाण्यासाठी अडीच लाख झालेला खर्च वाया गेला. कर्जाचा बोजा कसा फेडणार या विवंचनेत नानाहेब कदम होते. अखेर घरात कुणी नाही याची खातरजमा करुन त्यांनी २४ एप्रिल २०१४ रोजी दुपारच्या सुमारास गळफास घेवून स्वत:ला संपविले. मात्र त्यांच्या पश्चात कुटूंबावर संकटांचा डोंगर कायम आहे. नानासाहेब गेल्यामुळे पत्नी विमल हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. सासू, सासरेही मयत आहेत. दिराचा आधार घेत पोटच्या दोन मुलांना बळ देत विमलने स्वत:ला सावरत १० महिने काढले.महसूल व पोलिस पंचनाम्याचा प्रस्ताव महसूल प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. परंतु दाखल केलेल्या प्रस्तावास अधिकाऱ्यांनी त्रुटी काढून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रस्ताव फेटाळला. नानासाहेब कदम यांच्यावर कर्ज होते हे स्पष्ट असताना त्याने कर्जापायी आत्महत्या केली की नाही हे महसूल प्रशासनाला कळले नाही. १० महिन्यांपासून कदम कुटुंबिय मदतीपासून वंचित आहे. अशावेळी मुलांनी विमलला आधार दिला. राहूल वय (२६) हा सध्या पुण्यामध्ये कंपनीत कामाला आहे. तर लखन (वय २१) हा शेती सांभाळत आहे. यंदा तीन एकर माळरान जमिनीत विमल हिने कांदा लागवड केली. ४०० ते ४५० पिशव्या कांदे निघाऱ्या शेतात अवघे १५० पिशव्या कांदा निघाला. त्यातील अर्धे कांदे अवकाळी पावसात शेतातच भिजून नासून गेले. त्यामुळे यावर्षी नुकसानीला सामोरे जावे लागले. विहिरीचा पाणीसाठाही कमी झाला असून, बोअरही आटले. ज्वारीची ताटे जमिनीलगत आहेत. उत्पादन काय निघणार? यावर विमलबार्ईंचा गाडा कसा चालणार असा प्रश्न आहे. मात्र विमलबार्इंनी या संकटातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा कष्ट सुरु केले आहेत. शेतकऱ्यांनी संकटसमयी डगमगून न जाता संकटाचा धिराने सामना करावा. आपल्या पश्चात कुटूंबावर काय वेळ येईल याचाही विचार करायला हवा असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)४वडिलांनी कोरडवाहू जमीन किमान हंगामी बागायत व्हावी, यासाठी अडीच लाख खर्च केला. साडेतीन लाखाचे कर्ज झाले. त्यामुळे आत्महत्या केली. आम्हावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातूनही जगण्याची जिद्द कायम ठेवली. आत्महत्या कर्जासाठी पर्याय नाही. संकटाचा निपटारा करत शेतकऱ्यांनी जगावे, असे आवाहन लखन कदम यांनी केले आहे.