शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

एसटीथांब्यावर बसेस थांबेनात!

By admin | Updated: July 27, 2014 01:13 IST

चाकूर : एकीकडे महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ तोट्यात असल्याचा बोभाट केला जात असताना दुसरीकडे मात्र चालक- वाहकांची मनमानी होत असल्याचे पहावयास मिळत आहे़

चाकूर : एकीकडे महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ तोट्यात असल्याचा बोभाट केला जात असताना दुसरीकडे मात्र चालक- वाहकांची मनमानी होत असल्याचे पहावयास मिळत आहे़ अधिकृत थांब्यावरही बसेस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ परिणामी प्रवाशांना अवैध वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे़बहुजन हिताय, बहुजन सुखाय असे ब्रिदवाक्य घेऊन प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या महाराष्ट्र राज्य एस़टी़ महामंडळातील काही कर्मचाऱ्यांच्या असहकार धोरणामुळे प्रवाशांचे हाल होत आहे़त़ तालुक्यातील चापोली, लातूररोड, घरणी-आष्टा-महाळंग्रा ही राज्य मार्गालगतची गावे आहेत़ एस़टी़चा सुखाचा प्रवास म्हणून प्रवासी बसला जास्त प्राधान्य देतात़ एस़टी़चे ग्रामीण भागातील जाळे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे़बसेसमध्ये प्रवासी जास्त असले की, डबल बेल देऊन एस़टी़बस थांब्याच्या पुढे अथवा मागे उभी केली जाते़ अनेकदा प्रवासी बसथांब्यावर थांबवा म्हणून वाहक-चालकांशी वाद घालतात़ परंतु, त्याचा काहीच परिणाम होत नाही़ चापोली येथे बसेस थांबत नसल्याने येथून हिंपळनेर, आनंदवाडी, अजनसोंडा, शंकरवाडी, उमरगा कोर्ट, हणमंत जवळगा या भागातून ये- जा करणाऱ्या प्रवाशांची तारंबळ उडते आहे़ याप्रमाणेच परिस्थिती लातूररोड, घरणी, महाळंग्रा येथेही आहे़ त्यामुळे अनेक प्रवासी नाईलाजास्तव अवैध वाहतुकीचा आधार घेत आहेत़ अनेकदा अवैध वाहनांवर लोंबकळत राहून प्रवास करावा लागतो़ बसेस अधिकृत थांब्यावर थांबू लागल्या तर प्रवाशांची गैरसोय दूर होईल तसेच महामंडळाचे उत्पन्नही वाढेल़ चाकूर तहसीलसमोर बस थांबा आहे़ जवळच न्यायालय आहे़ त्याशेजारी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र असून, समोरच्या बाजूस औद्योगिक वसाहत आहे़ येथे विनंती थांबा देण्यात आला़ या ठिकाणी दररोज अनेक प्रवासी, विद्यार्थी थांबतात़ परंतु, बऱ्याच बसेस येथे थांबत नसल्याने नाईलाजास्तव प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे़ आयटीआयमध्ये जवळपास ३०० विद्यार्थी आहेत़ त्याचबरोबर विविध कामांनिमित्ताने नागरिक तहसीलला येत असतात़ परंतु, बस थांबत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे़ (वार्ताहर)़़़तर चालक-वाहकावर कार्यवाही़़़ एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना या समस्या सांगितल्या की, कोणत्या क्रमांकाची बस थांबली नाही़ त्याची तक्रार करा, आम्ही कार्यवाही करू अशी ठराविक उत्तरे मिळतात़ प्रवाशांनी लेखी तक्रारी केल्या, मात्र त्यावर कठोर कार्यवाही होत नसल्याचे सांगण्यात येते़प्रवाशांच्या या समस्येसंदर्भात लातूरचे आगारप्रमुख युवराज थडकर म्हणाले, एसटीच्या वाहक- चालकांना योग्य त्या सूचना करण्यात येतील़ जर पुन्हा तसाच कसूर केल्यास कार्यवाही करण्यात येईल़